खरवली ढालकाठी बौद्धवाडी येथे पत्नी माहेरी गेली म्हणून एका तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या…
राकेश देशमुख
महाड तालुका प्रतिनिधी
मो: 7887879444
महाड :-दिनांक 16 जुलै 2023 रोजी रात्रीच्या सुमारास महाड तालुक्यातील खरवली – ढालकाठी बौद्धवाडी येथे एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
पती व पत्नी या दोघांमध्ये लहान सहान गोष्टीवरून वारंवार भांडण होत असत यामुळे पत्नी रागाच्या भरात दोन महिने माहेरी निघून गेली होती.
या नैराश्यामधून 32 वर्षीय इसम मयत रविंद्र पांडुरंग आमले याने तीच्या साडीच्या साह्याने गळफास घेउन आत्महत्या केली आहे.
मयत रवींद्र पांडुरंग आमले हा मुळचा पिंपळवाडी, शेडगेवाडी येथील असुन तो सध्या ढालकाठी बौद्धवाडी येथे रहावयास होता.
महाड ग्रामीण रुग्णालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे.
तसेच या संपूर्ण घटनेचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ढेपे हे करीत आहे.