रायगड जिल्ह्यात मुसळधार अतिवृष्टी, अनेक ठिकाणी पूरस्थिती

रायगड जिल्ह्यात मुसळधार अतिवृष्टी, अनेक ठिकाणी पूरस्थिती

रायगड जिल्ह्यात मुसळधार अतिवृष्टी, अनेक ठिकाणी पूरस्थिती

प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करत भर पावसात मदत कार्य सुरू ठेवले

सायंकाळपर्यंत एकही जीवितहानी नाही

पोलादपूर व महाड येथे मदत कार्यात एनडीआरएफ

महसूल, पोलीस, स्थानिक प्रशासन, शासकीय विभाग, युवक मदत पथके,नागरी संरक्षण दल व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

कोकण :-रायगड जिल्ह्यात मुसळधार अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करत भर पावसात मदत कार्य सुरू ठेवले. जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील सवाद गावात पाणी शिरायला सुरुवात झालेने कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा सूचना देण्यात आल्या परंतु सवाद- माटवणं रस्त्यावर पुराचे पाणी आल्यानेे मदत कार्यात अडथळे निर्माण झाले होते “एनडीआरएफ”चे सहाय्याने राफ्ट तयार करून पुढे पाठवीत बचाव कार्य सुरू करण्यात आले. यामध्ये नरवीर मदत पथक सवाद येथ मदतीसाठी सहभागी होण्यासाठी पोहोचले.महाड शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेने नागरिकांच्या बचावासाठी एनडीआरएफ पथक आणि खालील ४ ठिकाणी बचाव पथके बोट साहित्यासह तैनात करण्यात आली.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासन व नगरपरिषदच्या मदतीसाठी एनडीआरएफचे निरीक्षक सुजित पासवान , निरीक्षक अंकित यांच्या सह पथके तैनात करण्यात आली. पुर परस्थिती उद्भवलेल्या चिरनेर उरण इथे आपत्ती व्यवस्थापन साठी प्रशासनाच्या वतीने शासनाचे विविध विभाग, स्वयंसेवी संस्था, आपदा मित्र यांनी सहभागी होऊन सकाळ पासून झाडे पडल्याने विस्कळीत झालेलीे रस्ते वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी मदत कार्य राबवून तसेच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेले.उरण चिरनेर या ठिकाणी मदतीसाठी या मुंबई येथून मदत पथक सहभागी झाले आहे. जांभिवली येथील रस्त्याला पडलेले ,भगदाड येथील स्थानिक नागरिकांनी तहसीलदार आयुब तांबोळी तसेच स्थानिक अधिकारी मार्गदर्शनाखाली ग्राम पंचायतीच्या ग्रामसेविक यांनी भरून रस्ता पूर्ववत सुरू केला आहे.पोलादपूर तालुक्यातील बोरज हद्दीतील साखर पेडेवाडी येथे दरड कोसळल्याने आपत्तीग्रस्त सर्व 8 कुटुंबे एकूण 22 लोकांना शाळेत स्थलांतरित करण्यात आले.

पोलादपूर तालुका बांधकाम विभाग यांनी आज सकाळ पासून पोलाद पूर आंबे नळी घाट रस्ता मोकळा केला असून यासह पोलादपूर तालुक्यातील पितळेवाडी -बोरघर रस्ता अडथळे दूर करून तसेच कूड़पण रस्ता मोकळा केला आहे.आज उपविभागीय अधिकारी कर्जत यांनी शेलू येथील नदी काठच्या भागात भेट दिली. पूर परिस्थिती चा आढावा घेऊन खबरदारी म्हणून २२ कुटुंब ८० व्यक्तीना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले . तुकसई, ता. खालापूर गावातील मुख्य पुलावरून पाणी वाहत आहे. वाहतूक बंद करण्यात आली आहे.जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे उद्या 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी शाळांना सुट्टी घोषित केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here