रायगड जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली : पुढील ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता…

52

रायगड जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली : पुढील ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता…

राकेश देशमुख

महाड प्रतिनिधी

मो: 7887879444

सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील २ नद्यांनी धोका पातळी तर २ नद्यांनी इशारा पातळी ओलांडली, रायगड पाटबंधारे विभाग पूर नियंत्रण कक्ष अधिकारी यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.पुढील ४८ तासात रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे पूरप्रवण आणि दरडग्रस्त गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाड येथील सावित्री नदी, येथील पातळगंगा नदीने ही धोका पातळी ओलांडली आहे, त्याचप्रमाणे अंबा नदी, कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली.