मार्ग, बाबांचा” – अरूण निकम

34

“मार्ग, बाबांचा” – 

 

समाज माझा, मी समाजाचा, 

अनुयायी बाबांचा,

अन त्यांनी दिलेल्या धम्माचा,

पाईक मी तथागतांचा,

त्यांच्या शांततेच्या सन्मार्गाचा,

स्वातंत्र्य, बंधुता अन समतेचा.!

 

देव बाटत होता, आमच्या स्पर्शाने, 

अपवित्र होई माणूस,  

माणसाच्याच सावलीने,

होता झाडू सक्तीचा ढुंगणावर,

करतांना रस्त्याने वावर, 

कारण ठसा पावलांच्या, 

अमंगल मानल्या जात होत्या!

 

त्या देवाने, धर्माने, 

आमच्या झोळीत काय टाकले?

दारिद्र्य, निरक्षरता, 

जिवाची चाळण उपासमारीने,

बधिर ठेवला, मेंदू कायम, 

अंधश्रद्धेच्या भुताने,

जाणीव हक्कांची,होऊच नाही दिली,

वेशी बाहेर घाण टाकली, 

असंवेदनशिलता, 

रोमा रोमात टिच्चून भरून ठेवली,

जनावराहून हीन समजून, 

वर्षानुवर्षे , पिढ्या न पिढ्यांची,

बरबादी केली.!

 

म्हणुन बाबांनी, विचारपूर्वक मानवतेचा धम्म अनुसरला, 

जिथे माणसांमध्ये भेदभाव नाही, 

उच्च नीचतेला वाव नाही, 

समानतेची कास धरी, 

स्वातंत्र्याचा पुकारा करी, 

अन प्रज्ञा, शील, करुणा, संघाचे 

पालन करीत, 

धम्माच्या मार्गाने प्रगती करीत,

 यशाचे शिखर मुठीत घेई.!

 

धम्माच्या मार्गाने प्रगती करीत, 

यशाचे शिखर मुठीत घेई.!!

धम्माच्या मार्गाने प्रगती करीत  

यशाचे शिखर मुठीत घेई .!!!

 

 

अरुण निकम, 

मो: 9323249487