पैशाचे आमिष देऊन बीड मध्ये 11 वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार.

पैशाचे आमिष देऊन बीड मध्ये 11 वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार.

पैशाचे आमिष देऊन बीड मध्ये 11 वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार.
पैशाचे आमिष देऊन बीड मध्ये 11 वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार.

✒️श्याम भुतडा✒️
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005
बीड,दि.18 ऑगस्ट:- आज भारतात 5 वर्षा पासून ते 70 वर्षाच्या महिलेवर मोठ्या प्रमाणात अत्याचार बलात्कार होण्याचा घटना वाढत आहे. अशी एक संतापजनक घटना बीड जिल्हातून समोर येत आहे. पैशाचे आमिष देऊन एका अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. विक्रम भगवान पवार अस नराधम आरोपीचं नाव असून आरोपीने मुलीला पैशाचे आमिष दाखवून तिला मक्याच्या शेतात नेऊन अत्याचार केला. या घटनेने खळबळ उडाली असून आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना नेकनूर पोलीस स्टेशनच्या परिसरात महिला सामाजिक कार्यकर्त्यानी आरोपीला चपलेने मारहाणीचा प्रयत्न केला. या घटनेने संताप व्यक्त केला जात असून नराधम आरोपीला कठोर शिक्षा करा अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे.

बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 11 वर्षीय चिमुकलीला खाऊसाठी पैशाचे अमिष दाखवून गावातील 25 वर्षीय आरोपीने तिला मकाच्या शेतात नेले. त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. शेजारच्या लोकांनी पाहिल्यानंतर पीडित मुलीची सुटका केली, तसेच आरोपीला चोप दिला. यानंतर आरोपीला पोलिसांच्या हवाली केले.

या सर्व प्रकरणी नेकनूर पोलिसांत पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध 376 (अ) (ब), अट्रोसिटी, पॉस्को ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला आज न्यायालयाय हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे यांनी दिली. या घटनेने संताप व्यक्त केला जात असून मागच्या एक महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये बलात्कार व महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आरोपी विरोधात कठोर कारवाई करा अशी मागणी केली जात आहे.