“जागतिक छायाचित्रण दिन” मिडिया वार्ता न्यूज कडुन काळा बरोबर एक नविन फैलु.

✒प्रशांत जगताप✒
कार्यकारी संपादक मिडिया वार्ता न्यूज
9766445348
महाराष्ट्र,दि.19 ऑगस्ट:- काळ बदलला तसेच मानवी जीवनातील अनेक फैलु बदलत गेले आहेत. त्यात छायाचित्रण हा फैलु खुप महत्वाचा आणि सुखद आहे. अनेक दा आपण जुने, बालपणीचे फोटो बघुन मनात सुखाच्या आनंदाच्या अनेक कल्पना करु शकतो.
आज या धावपळीच्या जगात फोटो काढायला कुणाला आवडत नाही? आपण जगलेले अविस्मरणीय क्षण, सुखद अनुभव, जीवनातील महत्वपुर्ण घटना कॅमेऱ्यात छायाचित्र रुपात कैद करत असतो. पुढील काळात हेच फोटो आठवणींच्या स्वरूपात आपले कायमचे सोबती बनून राहतात. हे फोटो पाहताना जुने दिवस पुन्हा जगल्याची एक वेगळीच भावना आपल्या मनात निर्माण होते. 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा केला जातो. कारण, या दिवशी सन 1839 साली फ्रेंच सरकारने फोटोग्राफीचे पेटेंट विकत घेऊन जगाला मुक्त केले. काही वस्तू प्रकाश आणि अंधाराचा खेळ यामुळे बदलतात. या साध्या तत्त्वातून साधारण सन 1800 मध्ये कॅमेरा ही कल्पना विचारात आली. 1839 च्या दरम्यान व्यावसायिक छायाचित्रकलेचा जन्म झाला. जोसेफ निकफेर निएपेस यांनी सर्वात पहिला फोटो काढल्याचे सांगितले जात आहे. जोसेफ यांनी 1926 ते 1927 दरम्यान फ्रान्सच्या बरगंडी प्रदेशातील ‘द ग्रास’ येथील एका खिडकीतून दिसणाऱ्या दृश्याचे पहिले छायाचित्र टिपले होते.
निसर्गाने प्रत्येक प्राणीमात्राला जन्मत: एक कॅमेरा दिला आहे, ज्यामुळे ते प्रत्येक वस्तूच्या छबीला आपल्या डोक्यात अंकित करू शकते आणि तो कॅमेरा म्हणजे आपले डोळे. तसं पाहिलं तर प्रत्येक प्राणी एक फोटोग्राफर आहे. वैज्ञानिक दृष्टीने माणसाने आपले साधन वाढविण्यास सुरुवात केली आणि अनेक आविष्कारांसोबत कृत्रिम लेन्सचा पण अविष्कार झाला. वेळे सोबत समोर चालतांना या लेन्सच्या छायाचित्रांना स्थाई रुपात समोर आणले. याच प्रवासाच्या यशाला आपण छायाचित्र दिनाच्या रुपात आज आपण साजरा करतो. लाखो कोरोडो शब्दांत जे सांगता येत नाही, त्यापेक्षा अधिक आशय एक समर्पक छायाचित्र सांगू शकते, असे आपल्या काही वेळेस निदर्शनास आले असेल. सध्या महाराष्ट्रात पावसाची रिमझीम सुरु आहे. पावसामुळे निसर्ग सौंदर्यालाही बहर आली आहे. हे क्षण टिपुण आपण आपले भुतकाळाच्या आठवणी साठवुन ठेऊ शकतो.