ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव (हरे)शिक्षक भर्ती प्रकरणी आमदारांना निवेदनाद्वारे चौकशी ची मागणी

ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव (हरे)शिक्षक भर्ती प्रकरणी आमदारांना निवेदनाद्वारे चौकशीची मागणी

ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव (हरे)शिक्षक भर्ती प्रकरणी आमदारांना निवेदनाद्वारे चौकशीची मागणी
ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव (हरे)शिक्षक भर्ती प्रकरणी आमदारांना निवेदनाद्वारे चौकशीची मागणी

ईसा तडवी✒
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यु-7666739067

पाचोरा :- पाचोरा तालुक्यातील ग्रा.वि.वि.विद्यालय पिंपळगाव हरे. बोगस शिक्षक भर्ती ची चौकशी व्हावी या साठी आमदार किशोर आप्पा पाटील यांना राजबाबू तेली यांनी दिले निवेदन. गेल्या काही दिवसांपवून खूप चर्चेचा विषय ठरत असलेल्या ग्राम. विकास विद्यालय मधील शिक्षक भर्ती. ग्राम. विकास मंडळ. अध्यक्ष देविदास महाजन यांना एका इंटरव्यूव्ह मध्ये विचारले असता त्यांनी सांगितले कि ग्राम विकास विद्यालय येथे कुठल्याही प्रकारची शिक्षक भर्ती होत नाहीये किंवा झालेली नाही आणि असे उत्तर त्यांनी त्यांच्या मुलाखती मध्ये दिले असता ग्राम विकास विकास मंडळाचे चिटणीस रवींद्र जाधव यांनी यांच्या मुलाखती मध्ये स्पष्ठ सांगितले होते कि आम्ही ग्राम विकास मंडळ अंतर्गत ग्राम विकास विद्यालय येथे सर्व शिक्षा अभियान मार्फत 30 मुलांमागे एक शिक्षक या नियमानुसार आम्ही 20% या मंजुरीवरती शिक्षक भर्ती घेतली आहे.मग अध्यक्ष का खोटे बोलत आहे यातून यांचा हेतू काय असावा अध्यक्ष व चिटणीस यांनी वेलवेगळी माहिती का दिली.या मागे काय कारण आहे.

आणि आम्ही या मध्ये 14. शिक्षक भर्ती केलेले आहेत. असे ग्राम विकास मंडळाचे चिटणीस रवींद्र जाधव यांनी सांगितले आपल्या मुलाखती मध्ये ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष यांनी खोटे का सांगितले याचा गावातील ग्रामस्थ राजेंद्र देवचंद तेली (राजा बाबु ) यांना संशय आला त्यांनी चौकशी केली असता त्यांना ग्राम विकास मंडळ पुरेशी माहित देत नाही होते. त्या नंतर RDR NEWS ने ग्राम विकास मंडळ यांच्या संचालक बॉडी मधील एक संचालक श्री. किशोर आप्पा गरुड यांची मुलाखत घेतली असता त्यांनी ग्राम विकास विद्यालय मध्ये जी शिक्षक भर्ती सुरु आहे ती बोगस शिक्षक भर्ती असून पैसा कमावणे हा हेतू डोळ्या समोर ठेऊन आपले घर भरण्यासाठी व आपल्या रक्ताच्या नात्यातील लोक भर्ती करण्यासाठी हि भर्ती प्रकिया राबविली जात आहे असे सांगितले . 2012 पासून शिक्षक भरतीला परवानगी नसल्यामुळे कुठेच शिक्षक भर्ती होत नाहीये व शासन कडून शिक्षक भर्ती बंद असून अनलिगली भर्ती प्रक्रिया राबवत आहे.

जळगाव जिल्यात विविध शैक्षणिक संस्था मध्ये शिक्षक व शिक्षकेतर पदे रिक्त असुन त्यांना भरती प्रक्रिया राबवण्यासाठी मान्यता मिळत नाही परंतु पिंपळगाव हरे.येथील ग्राम विकास मंडळ संचलित विविध विद्यालयात भर्ती मान्यता इतक्या तात्काळ काशीकाय प्राप्त होते हे शंका स्पद आहे. यामध्ये शिक्षण अधिकारी सुद्धा यांना पाठीशी घालत आहे. आशाही शिक्षण अधिकाऱ्याची चौकशी व्हायला पाहिजे. शिक्षक’ भरती प्रक्रिया राबवतांना कोणत्याही प्रकारची वृत्त पत्रात जाहिरात दिली गेलेली नाही. किंवा ज्यांना शिक्षक म्हणून भर्ती केलेले आहेत त्याचे कोणत्याही प्रकारची मुलाखती घेतलेल्या नाही हि भर्ती फ़क्त तोंड बघून आणि पैसे बघून केलेली आहे असे किशोर आप्पा गरुड यांनी त्यांच्या मुलाखती मध्ये स्पस्ट सांगितलेलं आहे. अजून किशोर आप्पा गरुड सांगतात कि आता जे शिक्षक भर्ती केलेलं आहे या पैकी 80%शिक्षक T. E. T. परीक्षा पास नाहीये आणि शासन नियमानुसार शिक्षक T. E. T. परीक्षा पास असायला पाहिजे तरच त्यांना सिलेक्त करू शकता . सांगितले त्यांचा या भर्ती प्रक्रियेला नकार होता त्यांना ग्राम विकास मंडळ यांच्या मिटिंग मध्ये सांगितले असता त्यांच्या वर्ती दबाव आणण्यात आला. त्या मुले त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला. त्यांनी असेही सांगितले ग्राम विकास मंडळ यां. संस्थेच्या संचालक बॉडी चा कार्यकाळ दोन वर्षांपासून संपलेला असून ग्राम विकास मंडळ येथील अध्यक्ष तरीपण इलेक्शन लावत नसून त्यांचा मनमानी कारभार करत आहे त्या कारभाराला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला. असे ते म्हणाले व महाराष्ट्रात पोट निवडणूक होऊ शकते ग्राम पंचायत निवडणूक होऊ शकते तर पिंपळगाव हरे येथील ग्राम विकास विद्यालयात निवडणूक का लावली गेली नाही या मागचा यांचा हेतू फक्त पैसे कमावणे हा होय किशोर आप्पा गरुड यांनी हे सगळं स्टेटमेंट पुराव्या निशी दिले असून त्यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ. अगोदर च प्रसिद्ध करण्यात आला होता.
सदर मंडळामध्ये काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे आपल्या घरातील एक ना एक कर्मचारी नोकरीला लावूनच शांत बसतो. असे हि त्यांनी सांगितले

सदर भरती प्रक्रिया हि 2017 ची शिक्षक भरती दाखवून ज्या मुख्याध्यपकांनी नेमणुकीच्या कागद पत्रांवरती सह्या करणारे मुख्याध्यापक व आताचे मुख्याध्यापक यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे रोस्टर{बिंदू नामावली ]प्रमाणे हि भरती प्रक्रिया राबवली गेलेली दिसून येत नाहीये पिंपळगाव हरे येथील तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र देवचंद तेली त्यांनी गरिबांचे मायपाय असलेले ज्यांची ओळख कार्यसम्राट म्हणून अशी पूर्ण भडगाव पाचोरा तालुका भर नाव आहे. त्याची कार्याची चर्चा पूर्ण जिल्हाभर आहे असे माननीय कार्यसम्राट किशोर आप्पा पाटील यांना राजेंद्र देवचंद तेली यांनी या बोगस शिक्षक भर्ती बद्धल कसून चौकशी व्हावी या साठी निवेदन दिले आहेत. आता पिंपळगाव हरे. येथील गरीब जनता व येथील भावी व आजी विध्यार्थी वर्ग गावातील ग्रामस्थ आणि सुशिक्षित तरुण वर्ग यांची आस. आशेचा किरण असलेलं आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या कडे लक्ष आहे कि आप्पा आता शाळेत येऊन विचारपूस करतील किंवा अधिकाऱ्यांना जाब विचारतील आप्पाचे जसे कार्य आहे त्या नुसार आप्पा कडून ग्रामस्थांना खूप अपेक्षा आहेत आप्पानी पुढील पिढी साठी या प्रकरणाची चौकशी करावी असे गावातील ग्रामस्थ यांनी इच्छा व्यक्त केली आहे.