हिंगणघाट येथील गोळीबार प्रकरणाला अनैतिक सभांधाची किनार… पोलीसांच्या सतर्कतेने टळली सुपारी देऊन खून करण्याची मोठी घटना.

हिंगणघाट येथील गोळीबार प्रकरणाला अनैतिक सभांधाची किनार…
पोलीसांच्या सतर्कतेने टळली सुपारी देऊन खून करण्याची मोठी घटना.

हिंगणघाट येथील गोळीबार प्रकरणाला अनैतिक सभांधाची किनार... पोलीसांच्या सतर्कतेने टळली सुपारी देऊन खून करण्याची मोठी घटना.
हिंगणघाट येथील गोळीबार प्रकरणाला अनैतिक सभांधाची किनार…
पोलीसांच्या सतर्कतेने टळली सुपारी देऊन खून करण्याची मोठी घटना.

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट : -हिंगणघाट तालुक्यातील येणोरा येथिल गोळीबार प्रकरणाला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे समोर आले असून , हिंगणघाट पोलीसांच्या सतर्कतेने एक मोठी खुनाची घटना थांबली आहे .
दिनांक ११ आगष्टला हिंगणघाट येथे नंदोरी चौकात रात्री ११ वाजताच्या सुमारास दोन संशयास्पद वर्तन असलेल्या पल्सर दुचाकी वरुन आलेल्या तरुणांना पोलिस जमादार कमलाकर धोटे यांनी विचारपुस केली असता त्यातील एका तरुणाने रिवाल्वर काढुन धोटे यांच्यावर गोळी चालविण्याचा प्रयत्न केला होता.सुदैवाने बंदुकीतुन गोळी चालली नव्हती.हे दोन्ही गुंड त्यावेळी पसार झाले होते.या प्रकरणात गुन्हा नोंदऊन अज्ञात गुंडांच्या शोधात हिंगणघाट पोलिस चमु कामाला लागले असता दुसर्‍या दिवशी १२ ऑगस्ट ला रात्री 9 च्या दरम्यान पोलिस उपनिरिक्षक अमोल लगड हे आपल्या चमुसह गुंडांच्या शोधात येनोरा येथे जात असताना . यातील दोन गुंडांनी लगड यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या.यात स्वरक्षणार्थ लगड यांनीही गुंडांवर एक गोळी झाडली होती.या गोळीबारात कुणीही जखमी झाले नव्हते.मात्र अंधाराचा फायदा घेऊन पुन्हा एकदा ते दोन्ही गुंड पळुन जाण्यात यशस्वी ठरले होते.१३ ऑगस्ट रोजी सकाळी जिशान शेख उर्फ जितेंद्र महेश गुप्ता(२१) व एक अल्पवयीन बालक अशा दोन गुंडांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र आरोपींचे येनोरा गावात जाणे हे कोडे सुटले नव्हते . यात पोलीसांनी आरोपींकडून कसून चौकशी केली असता
या गोळीबार प्रकरणाला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे समोर आले आहे.
येणोरा गावातील आशिष राउत(२८) याचे त्याच गावातील एका दारुविक्रेत्याच्या पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याचा तिच्या पतीला संशय होता . या दरुविक्तेत्याने जानेवारी महिण्यात आशिष राउत याच्या मागे कुर्‍हाड घेउन धावला होता व जिवे मारण्याची धमकी दिली.जिवाच्या भितीने आशिष राउत हा मागील सहा महिन्यांपासून गाव सोडुन वरोरा येथे राहात होता.त्याने आरोपीं सोबत संपर्क साधुन त्याचे अनैतिक संबंध असलेल्या महिलेच्या पतीला मारण्याची दोन लाखात सुपारी दिली होती. यादरम्यान सुरुवातीला वीस हजार रुपये देसी कट्टा विकत घेण्यासाठी म्हणून आशिष राऊत ने त्या दोन्ही गोळीबार प्रकरणातील आरोपींना दिले होते या आरोपींनी बिहार येथे जाऊन देसी कट्टा देखील विकत आणलेला होता. ज्या पल्सर दुचाकीच्या सहायाने ते बिहारी दोन्हीं आरोपी हत्या करण्यासाठी आले होतें ती दुचाकी घेण्यासाठी देखील 35 हजार रूपये यातील मास्टर माईंड आशीष राऊत याणेच दीले होतें.11ऑगस्ट रोजी दारु विक्रेत्या टार्गेट सोबत काहीं लोक असल्याने तो डाव फसला होता. या दरम्यान
११ आगष्टलाच रेकी करुन १२ आगष्टला काम पुर्ण करण्याचे नियोजन झाले होते. पण पोलिसांच्या सतर्कतेने हा डाव उधळल्या जाउन आता या गुन्ह्यात कलम १२०(ब),११५ भादवि प्रमाणे कलम वाढ करण्यात आली व या गुन्ह्यातील मास्टर माईंड आरोपी आशिष राउत याला वरोरा येथून अटक करण्यात आली असुन पुढील तपास सुरु आहे.
दरम्यान पुढील तपासासाठी हिंगणघाट न्यायालयाने जिशान शेख याला २० आगष्ट पर्यंत व आशिष राउत याला २४ आगष्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मात्र हिंगणघाट येथील पोलिस उप निरीक्षक अमोल लगड , सहायक पोलिस निरिक्षक गुन्हे शाखा वर्धा महेंद्र इंगळे सह गुन्हे शोध पथकाच्या शेखर डोंगरे , निलेश तेलरांधे, सचिन भारशंकर, उमाकांत लडके , सचिन घेवंदे, विशाल बंगालेयांनी गुन्ह्यांची तीव्रता लक्षात घेता यातील मास्टर माईंड आशीष राऊत यास मोठया शिताफीने अटक केली हे कौतुकास्पद आहे.