कळमेश्वर येथे स्वतंत्र दिन उत्साहात साजरा, न.पा उपाध्यक्ष ज्योत्स्नाताई मंडपे यांच्या हस्ते ध्वजारोहण.

✒️युवराज मेश्राम✒️
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
कळमेश्वर:- 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन निमित्त भारतीय बौद्ध महासभा तालुका कळमेश्वर तर्फे तिरंगाचे ध्वजारोहण नगर परिषद कळमेश्वर ब्राम्हणीच्या उपाध्यक्ष ज्योत्स्नाताई मंडपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सरजूभाऊ मंडपे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना पुष्पमाला अर्पण करण्यात आली. नंतर राष्ट्रगीत घेण्यात आले. आयुष्य माननी ज्योत्स्ना ताई मंडपे नगर उपाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष अरुण वाहणे, भुजंगराव मोजनकर, वैशाली वाहणे यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक व संचालन राहुल जी वानखेडे तर आभार प्रदर्शन दादाराव शिरसाट यांनी केले. या प्रसंगी तक्षशीला बुद्ध विहार कार्यक्रमाच्या अध्यक्षा अर्चना ताई उके, शशिकला चाणकापरे, लता ताई खडसे, राजकन्या पाटील, सुलोचना वाहणे, नंदा भंडारे,वानखेडे ताई, सिंधुताई देशभ्रतार, गोंडाणे ताई, पत्रकार युवराज मेश्राम, चंदू श्रीखंडे, निखिल गोंडाणे, बागडे प्रामुख्याने उपस्थित होते.