नागपुर: तरुणाने बहिणीची काढली छेड म्हणून भावाने केली तरुणाचा खून.

✒युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर,दि.19 ऑगस्ट:- नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धारदार शस्त्राने शरीरावर सपासप वार करून एका तरुणाची निर्घुण खून करण्यात आला. ही घटना नागपुर शहरातील कपिल नगर भागातील म्हाडा कॉलनी परिसरात बुधवारी सायंकाळी घडली. कमलेश बंडू सहारे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. आरोपीच्या बहिणीची तरुणाने छेड काढल्याने ही घटना घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पोलिसांनकडुन प्राप्त माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मयत कमलेश सहारे याने नागपुर येथील म्हाडा कॉलनी परिसरात एका मुलीची छेड काढली होती. याप्रकरणी पोलिसांनी कमलेशवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.
त्यानंतर तो काही दिवसापूर्वी जामिनावर बाहेर आला. बुधवारी तो आपल्या बहिणीकडे गेला असता तरुणीचा भाऊ व त्याच्या साथीदारांनी कमलेशला रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात कमलेशचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत.
पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे. मागच्या काही दिवसात नागपूरमध्ये हत्येच्या अनेक घटना घडल्या आहेत. हत्यांचे सत्र सुरू असल्याने नागपूरकरांच्या मनात भितीचे वातावरण तयार झाले आहे.