नांदेड, कोविड योद्धा किशोर कुऱ्हे यांचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते गौरव

✍️मनोज खोब्रागडे✍️
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
नांदेड :- जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर अशोकराव कुऱ्हे यांचा सार्वजनिक बांधकामंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मागील दोन वर्षांपासून कोविड-19 काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल रविवार 15 ऑगष्ट रोजी स्वातंत्र दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.
यावेळी पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी आदी उपस्थित होते.