गडचांदूर शहरात पिण्याच्या पाण्यात जंतू वाटर फिल्टर असून

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
गडचांदूर शहरातील पिण्याचे पाण्या मध्ये जंतू तेही वाटर फिल्टर असूनही पिण्याचा पाण्या मध्ये जंतू
खलील वृत्त या प्रमाणे आहे
गडचांदूरकरांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी येथील नगरपरिषदेने मोठा गाजावाजा करून शहरातील वार्डा वार्डात वाटर फिल्टर लावले.मात्र हे फिल्टर नानाकारणाने सतत नागरिकांत चर्चेचा विषय ठरत आहे.याचे ताजे उदाहरण म्हणजे येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये लावण्यात आलेल्या शुद्ध पाण्याच्या वाटर फिल्टर मधून चक्क जंतू निघत आहे.गेल्या ४,५ दिवसापासून याविषयी येथील वार्डवासीयांची बोंबाबोंब सुरू असून स्थानिक नगरपरिषद शासनप्रशासन मात्र याकडे लक्ष देताना दिसत नाही.काही महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात सदर वाटर फिल्टरचे उदघाटन करण्यात आले.शुद्ध पाणी मिळत असल्याने स्थानिक वार्डवासी सुद्धा आनंदी दिसत होते.
मात्र आता या पाण्यात जंतू निघत असल्याने नागरिकांपुढे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.योग्यप्रकारे देखरेख होत नसल्याने आजघडीला वाटर फिल्टरची दैनावस्था झाल्याचे चित्र आहे. यापुढेही या वाटर फिल्टरातून जंतू निघत होते.लोकांच्या तक्रारी वरून थातूरमातूर कारवाई करून तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार घडला. परिणामी आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.सदर वाटर फिल्टर हे कर्तव्यदक्ष नगराध्यक्षांच्या वार्डात व त्यांच्या निवासस्थाना पासून हाकेच्या अंतरावर तसेच सत्ताधारी पक्षाच्या एका नगरसेविका तथा सभापतीच्या घरा समोर आहे हे मात्र विशेष.
,डेंग्यु,मलेरिया असे जीवघेण्या रोगामुळे अगोदरच नागरिक दहशतीत वावरत आहे.अशातच जंतूयुक्त पिण्याच्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरपरिषदेने याकडे लक्ष देऊन सदर समस्या तात्काळ मार्गी लावावी अशी मागणी