रसिकांची दाद मिळवणारे ‘वेड लागले’ अल्बम सॉंग येण्यासाठी सज्ज, फर्स्ट लूक झाला रिलीज.

रसिकांची दाद मिळवणारे ‘वेड लागले’ अल्बम सॉंग येण्यासाठी सज्ज, फर्स्ट लूक झाला रिलीज.

रसिकांची दाद मिळवणारे 'वेड लागले' अल्बम सॉंग येण्यासाठी सज्ज
रसिकांची दाद मिळवणारे ‘वेड लागले’ अल्बम सॉंग येण्यासाठी सज्ज

✒  प्रशांत जगताप ✒
   कार्य. संपादक
📲9766445348📲
मुंबई/नागपुर/जळगाव:- मराठी ऑनलाइन रंगभूमीवर रसिकांची दाद मिळवणारे ‘वेड लागले’ अल्बम सॉंग येण्यासाठी सज्ज आहे. अरविंद एंटरटेनमेंट प्रेझेंट ‘वेड लागले’ हे मराठी ऑफिशियल अल्बम सॉंग गेल्या महिन्यात शूट झाले असून याचे दिग्दर्शन प्रदिप भोई यांनी केले आहे, चित्रीकरण पाल व मध्य प्रदेश मधल्या काही ठिकाणी उत्कृष्टरित्या संपन्न झाल.

‘तुझे पैंजण’ या मराठी रोमॅंटिक सॉंग नंतर अरविंद इंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा एक धडाकेबाज रोमँटिक सोंग घेऊन येत आहे आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी इंटरटेनमेंट च्या ऑफिशियल यूट्यूब चैनल ला ‘वेड लागले’ या गाण्याचा फर्स्ट लूक रिलीज झाला.

हसत-खेळत आयुष्य जगणारे, प्रेमाचे नवी पालवी फुलवुन संपुर्ण जीवन आंनदात जगण्याचे क्षण आपल्या सहजीवनातील व्यक्ती बरोबर खर आयुष्य जगण्याचे पण घेऊन नेहमी हसत गोड चेह-यावरची ती स्माईल सर्वच सांगून जाते. विजिगीषु वृत्तीनं नटी आणि नट आपल्या व्यक्तिरेखेचे हे सारे कंगोरे प्रचंड तपशिलांत समजून उमजून घेऊन साकारले आहे.

 

फर्स्ट लूक पोस्टरमध्ये प्रवीण लाड, पायल राऊत आणि शुभम चिंचोले वेगळेच रूप पाहायला मिळत आहे. तिच्या डोळ्यांत एखादे ध्येय प्राप्त करण्याचे भाव दिसत असून येणाऱ्या संकटांवर ते यशस्वीरित्या मात करेल, हा विश्वासही आहे. यापूर्वीच प्रवीण लाड, पायल राऊत आणि शुभम चिंचोले यांनी आपले अभिनयकौशल्य सिद्ध केले असून ”वेड लागले” या व्यक्तिरेखेतूनही ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.

बंधन प्रोडक्शन आणि भाग्यदीप म्युझिक हे या गीतामध्ये असोसिएट पाहणार असून प्रवीण लाड, पायल राऊत आणि शुभम चिंचोले यांनी गाण्यामध्ये मुख्य भूमिका साकारलेली आहे. सोबतच नेहा वंदना सुनील, खुशबू शिंदे, ऋतिका पाटील, रितेश इंगळे आणि अजय सोनवणे यांनी सहा कलाकाराची भूमिका निभावली आहे. गाण्याचे बोल हे प्रवीण लाड यांचे असून, कम्पोसिंग मध्ये प्रवीण लाड आणि कुणाल पवार यांनी काम केलं आहे. सोबतच कुणाल पवार आणि प्रिया बुरुकले यांनी हे गीत गायले आहे.खानदेश मधील सुप्रसिद्ध असलेले ‘डीजे प्रमोद’ यांनी गाण्याला रिदम व म्युझिक दिले आहे.

रसिकांची दाद मिळवणारे 'वेड लागले' अल्बम सॉंग येण्यासाठी सज्ज, फर्स्ट लूक झाला रिलीज.

चित्रीकरण आणि संकलनात नामांकित बंधन प्रोडक्शन ( योगेश ठाकूर) आणि ब्लॅक व्हाइट सिनेमा (दिपराज गाढे) यांनीसुद्धा गाण्यामध्ये चित्रीकरण भूमिका केली आहे. ड्रोन पायलट म्हणून जामनेर येथील मनोज तडवी यांनीही काम केले आहे.

नागपुरातील सुप्रिया ढोके अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सदस्या आणि गेल्या 5 वर्षांपासून एक तरुण फॅशन डिझायनर आहेत.
सुप्रिया ढोके या 4 वर्षांपासून एक व्यावसायिक फॅशन डिझायनर, कलाकार, केशभूषाकार म्हणून काम करत आहे. या क्षेत्रात कठोर परिश्रम आणि सतत प्रयत्नांमुळे सुप्रिया ढोके यांनी संपूर्ण विदर्भात आपली योग्य प्रतिमा निर्माण केली आहे. तर खुशबू शिंदे यांनी कलाकारांचे मेकअप आणि कोरिओग्राफी केली आहे. फर्स्ट लूक नंतर प्रेक्षक गाण्याची आतुरतेने वाट पाहत असून वेड लागले हे सॉंग प्रेक्षकांना युट्युब आणि टीव्हीवरती सुद्धा लवकरच बघायला मिळणार आहे. याच महिन्यामध्ये गाणं हे प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.