आलापल्ली वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने ताडवृक्ष बिज लागवड कार्यक्रमाचे आयोजन

आलापल्ली वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने ताडवृक्ष बिज लागवड कार्यक्रमाचे आयोजन

आलापल्ली वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने ताडवृक्ष बिज लागवड कार्यक्रमाचे आयोजन

अहेरी तालुका प्रतिनिधि
स्वप्निल श्रीरामवार
मो न 8806516351

अहेरी : – आपल्या भारत देशातील अनेक राज्यात ताड वृक्षापासून निर्मीत पेयजल व ताडफळ विक्रीव्दारे मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळविल्या जात आहे . त्याच धरतीवर महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त दुर्गम व रोजगाराच्या अत्यल्प संधी उपलब्ध असलेल्या गडचिरोली जिल्हूयातील स्थानिक नागरिकांच्या लोकसहभागातून वनाच्या शाश्वत विकासा सोबतच रोजगार निर्मितीव्दारे स्थानिक नागरिकांच्या उत्पादनात भर टाकून त्यांचे जिवनमान उचाविण्याचे महत्त्वपूर्ण उद्देश समोर ठेवून मा. श्री. एम . श्रीनिवासराव , व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र बांबू विकास मंडळ , महाराष्ट्र राज्य तथा पालक गडचिरोली वनवृत्त यांच्या संकल्पनेतुन तथा मा.श्री. डॉ . किशोर मानकर वनसंरक्षक , गडचिरोली वनवृत्त , मा . श्री . राहुलसिंह टोलिया , उपवनसंरक्षक , आलापल्ली वनविभाग , मा . श्री . नितेश शंकर देवगडे , उपविभागीय वनअधिकारी , आलापल्ली वनविभाग यांच्या मार्गदर्शनात व श्री योगेश शेरेकर वनपरिक्षेत्र अधिकारी आलापल्ली यांच्या नेतृवात लोकसहभागातून श्रमदानाव्दारे दिनांक 18/08/2022 रोजी आलापल्ली वनपरिक्षेत्र आलापल्ली , नियतक्षेत्र आलापल्ली- 1 मधिल कक्ष क .01 क्षेत्र 2.000 हेक्टर वर 1111 ताडवृक्ष बिज लागवडीचे वनपरिक्षेत्र कार्यालय आलापल्ली , ग्रामपंचायत कार्यालय आलापल्ली , स्व . लक्ष्मीबाई कला विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय आलापल्ली , राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली , राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली स्थित नागेपल्ली व जंगल कामगार सहकारी संस्था आलापल्ली वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने ताडवृक्ष बिज लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा . श्री . दिपकदादा आत्राम , माजी आमदार अहेरी
विधानसभा क्षेत्र प्रमुख अतिथी म्हणुन मा . श्री . अजयभाऊ कंकडालवार ,
माजी , जिल्हा परिषद अध्यक्ष गडचिरोली तथा अध्यक्षा भगवंतराव शिक्षण मंडळ , अहेरी , मा . श्रीमती भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर
, , श्री शंकरजी मेश्राम संरपच ग्रामपंचायत आलापल्ली , श्री सुरेश गड्डमवार ,अध्यक्ष तंटामुक्ती समिती ग्राम पंचायत , ग्राम पंचायत सदस्य तथा राष्ट्रवादी कांग्रेस अहेरी युवा तालुका अध्यक्ष स्वप्निल श्रीरामवार , राष्ट्रवादी कांग्रेस तालुका अध्यक्ष अहेरी श्रीनिवास जी वीरगोंनवार सुमित मोतकुरवार अहेरी विधानसभा प्रमुख लक्ष्मण येरावार सागरजी जिल्हा प्रचारक, प्राचार्य राजेश गरगम प्राध्यापीका प्रतिमा सुर्यवंशी , प्रा . रविंद्र ढवळे , प्रा . प्रकाश सोनुले , प्रा . दामाजी डोंगरे , प्रा . प्रमोद मेश्राम , प्रा . गणेश पहापाडे , प्रा . रितेश रायकुंडलीया उपस्थित होते .

*प्रमुख अतिथि प्रसंगी बोलतांना श्रीमती भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांनी ताडवृक्ष बिज लागवड उपक्रम हे स्थानिक आदिवासी समाजाच्या जिवनात रोजगाराची नविन संधी घेऊन येणारा असुन ऐवढया मोठया प्रमाणावर लोकसहभागातुन श्रमदानाव्दारे ताडवृक्ष बिज लागवड करण्याची हि गडचिरोली अथवा महाराष्ट्र राज्यातीलच नाही तर भारत देशातील पहिली घटना असल्याचे म्हटले*

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या
प्रसंगी बोलतांना श्री दिपक आत्राम माजी आमदार यांनी ताडवृक्ष हे कल्पवृक्ष असुन ताडाचे निरा , फळ , खोड , मुळ आदि सर्व अंगाचा उपयोग होतो . आदिवासी समाजात महत्वाचे स्थान असलेले गोटुल हे आधि ताडवृक्षाव्दारेच निर्माण केले जात होते . त्यामुळे ताडवृक्ष हे आदिवासी समाजाच्या जिवनाचा अविभाज्य भाग आहे . वनविभागाव्दारे प्रथमच ताडवृक्ष बिज लागवडीचे अभिनव उपक्रम हाती घेण्यात आल्याने वनविभागाचे अभिनंदन केले .
या प्रसंगी बोलतांना श्री अजयभाऊ कंकडालवार यांनी आलापल्ली वनपरिक्षेत्राव्दारे घेण्यात आलेले ताडवृक्ष बिज लागवड कार्यक्रमामुळे ताडवृक्षा पासुन तयार होणारी निरा व सदर निरेदारे तयार होणारे गुळ या उद्योगाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळुन स्थानिक नागरीकांना व युवकांना रोजगाराच्या मोठया प्रमाणावर संधी निर्माण होतील त्यामुळे आलापल्ली वनपरिक्षेत्रा व्दारे घेण्यात आलेल्या ताडवृक्ष बिज लागवड कार्यक्रमाला चळवळीचे रूप देऊन आलापल्ली वनविभागातील प्रत्येक गावात अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आव्हान केले .
या प्रसंगी बोलतांना श्री शंकर मेश्राम एकीकडे मोठया प्रमाणावर वृक्ष तोड होत आहे . त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडुन जिवसुष्टी धोक्यात आली आहे . आधी दिसणारे प्राणी व पक्षाची थवे हे आता दुर्मिळ होत चालले आहे . अशा प्रसंगी लोकसहभागातुन आलापल्ली वनपरिक्षेत्रात ऐवढ्या मोठया प्रमाणावर घेण्यात आलेले ताडवृक्ष बिज लागवड कार्यक्रम हा प्रेरणादायी आहे .
या प्रसंगी बोलतांना श्री सुरेश गड्मवार यांनी लोक प्रतिनिधी , स्थानिक नागरीक , विद्यार्थी , शासकिय अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातुन श्रमदानाव्दारे करण्यात आलेली ताडवृक्ष बिज लागवड कार्यक्रमाव्दारे वृक्षलागवड हि सामान्य मानसापर्यंत पोहचण्याचे महत्वाचे माध्यम ठरले आहे . त्यामुळे येणाऱ्या काळात प्रत्येक नागरीकांच्या मनात वृक्षा विषयी आदराची भावना निर्माण होईल .
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल झाडे क्षेत्र सहाय्यक आलापलली यांनी तर आभार प्रदर्शन नितेश शंकर देवगडे उपविभागीय वन अधिकारी , आलापल्ली यांनी मानले . तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आलापल्ली वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक अनिल झाडे , मोहन भोयर , प्रकाश राजुरकर , ऋषीदेव तावाडे , पुनम बुध्दावार , पितांबर कुमरे , नियत वनरक्षक दामोधर चिव्हाणे , सचिन जांभुळे , तुषार मडावी , चंदु सडमेक , दशरथ राठोड , संतोष चव्हाण , बक्का कुळमेथे , वंदना कोडापे , लक्ष्मी नाने , मलीया शेख , काशीनाथ टेकाम , देवानंद कचलामी , कैलाश मातने , महेंद्र एलीचपूरवार , बंटी अलोने , जम्मु पुडो , श्रीनिवास गंजीवार , गोपाल जुदुवार , बंडु रामगिरवार , , तुकाराम सोनटक्के , मुस्तफा शेख , सुखदेव दिवसे , निशांत म्हशाखेत्री वाहन चालक नाना सोयाम , विक्की कोडापे अनुराग तुड्डूरवार आदिनी परिश्रम घेतले .