कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणाला विरोध भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्षांनी दिले निवेदन

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणाला विरोध

भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्षांनी दिले निवेदन

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणाला विरोध भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्षांनी दिले निवेदन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀8554920002🪀

मालेगाव: – मालेगांवच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांचा शेतीमाल ठेवण्यासाठी बांधलेल्या शेडमध्ये व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत भाजप किसान मोर्चाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना 18 ऑगस्ट रोजी निवेदन देऊन विरोध दर्शविला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आमच्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेड बांधण्यात आली आहे.
परंतु मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा शेतीमाल ठेवण्यासाठी बांधलेल्या शेडमध्ये व्यापाऱ्यांनी स्वत:ची मालकी समजून तार जाळ्या व टीन बसवून कायमस्वरूपी अतिक्रमण केले आहे.
शेड केवळ शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी असेल, तर बाजार समिती प्रशासनाने विलंब न लावता अतिक्रमण हटवावे.
खरीप हंगामातील शेतमालाची आवक लवकरच सुरू होणार आहे. त्यापूर्वी अतिक्रमण हटवावे, जेणेकरून शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकविलेला शेतमाल सुरक्षित राहील.
याबाबतचे निवेदन मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांना भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दिले आहे.✍