राजस्थान येथील घटनेच्या निषेधार्थ नंदुरबार येथे भीम आर्मी कडून मटके फोडून आंदोलन

राजस्थान येथील घटनेच्या निषेधार्थ नंदुरबार येथे भीम आर्मी कडून मटके फोडून आंदोलन

राजस्थान येथील घटनेच्या निषेधार्थ नंदुरबार येथे भीम आर्मी कडून मटके फोडून आंदोलन

विशाल सुरवाडे
प्रतिनिधी

नंदूरबार- दिनांक -१८/०८/२०२२ रोजी नंदुरबार जिल्हा भीम आर्मी च्या वतीने नंदुरबार शहर नेहरू चौक या ठिकाणी मटकी फोडून आंदोलन करण्यात आले.
सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे.त्यात त्यांचा आंदोलन करण्याचा मुख्य विषय असा होता की, राजस्थान मधील इंद्रकुमार मेघवाल हा मुलगा नव वर्षाच्या असून इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत होता. एका शाळेच्या मटकी मधून फक्त एक ग्लास पाणी पिला, तर त्या शिक्षकाने त्या मुलाला बेदम पद्धतीने मारहाण केली, त्या मारहाणीमुळे त्याला अत्यंत त्रास झाला. त्यामुळे तो मृत्यूशी झुंजत देत होता, शेवटी गुजरात मधील अहमदाबाद या ठिकाणी रुग्णालय मध्ये त्या बालक चा मृत्यू झाला.
त्याकरता त्या शिक्षकाला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे त्या साठी भीम आर्मी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने मटके फोडून आंदोलन करण्यात आले. आणि भीम आर्मी नंदुरबार जिल्हा पदाधिकाऱ्यांनी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन पी ,आय, साहेब यांच्या द्वारे राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
निवेदन देत्या वेळी भीम आर्मी नंदुरबार जिल्हाध्यक्ष संजू रगडे, उपजिल्हाध्यक्ष रवी रगडे, जिल्हा प्रवक्ता लोटन पेंढारकर,जिल्हा संघटक भैय्या पिंपळे,तालुका अध्यक्ष शरद पिंपळे, जिल्हा मीडिया प्रभारी दीपक जाधव, मोगेश भालेराव, प्रमोद कांबळे,दीपक खरताळे, कालु मराठे, कृष्णा भालेराव, विलास फुलपगारे, गणेश अभंगे, लल्लू तमयचेकर, पप्पू पगारे, मुन्ना यलमार, कलीम शेख तसेच भीम आर्मीचे ईतर कार्यकर्ते, महिला व लहान मुले देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते