MPSC 2022 ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी:
✍जितेंद्र तडस ✍
हिवरखेड शहर प्रतिनिधी
9730278114
अमरावती : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी समोर आली आहे . ती म्हणजे वाढीव जाग्या ची मागणी ही mpsc ने मान्य केली आहे. त्यानुसार जाहिरात मध्ये पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 द्वारे 161 संवर्गाच्या भरतीकरीता दि.11 मे 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये (जा.क्र.45/2022) खालील संवर्गाची पदे समाविष्ट करण्यासंदर्भात शासनाकडून मागणीपत्रे प्राप्त झाली आहेत त्यानुसार आता 161 +340 = 501 पदासाठी ही भरती होणार आहे. असे mpsc ने संकेतस्थळ द्वारे कळविले आहे :
(1)उपजिल्हाधिकारी,गट अ-33
(2)पोलीस उपअधीक्षक,गट अ-41
(3)सहायक राज्यकर आयुक्त, गट अ-47
(4) उपमुख्य कार्यकारी अधिकारी,गट अ-14
(5) उपनिबंधक,सहकारी संस्था, गट अ-2
(6) शिक्षणाधिकारी, गट अ-20
(7) प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी),गट अ-6
(8) तहसीलदार, गट अ-25
(9)सहायक गट विकास अधिकारी,गट ब -80
(10) उपअधीक्षक,भूमी अभिलेख,गट ब-3
(11)सहायक निबंधक,सहकारी संस्था,गट ब -2
(12) उपशिक्षणाधिकारी, गट ब-25
(13)सहायक प्रकल्प अधिकारी,गट ब- 42
वरील वाढीव पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.