वानर पिल्लुचे अंत्यविधी करून फ़्रिडमने कायम केली माणूसकी
✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर-9860020016
साकोली : दि. १९ ऑगस्टला माजी आमदार राजेश काशिवार यांच्या घरा समोर एका जखमी वानराचे पिल्लू जखमीवस्थेत आढळले. याची माहिती प्राणीप्रेमी तथा फ्रिडम युथ फेडरेशनचे अध्यक्ष किशोर बावणे यांना दूरध्वनीवरून कळली तात्काळ त्या जखमी वानरपिल्लूस सेंदूरवाफा येथील पशुवैद्यकीय मध्ये उपचारासाठी नेण्यात आले. त्याच्यावर उपचार करत असतांना परीचारक प्रतीक बोबडे यांनी त्याचे उपचार केले पण उपचार दरम्यान त्या वानराचे पिल्लू मृत्यू पावले. अश्या वेळेस फ़्रिडमचे किशोर बावणे यांनी त्या वानराच्या पिल्लू चे अंत्यविधी करण्याचे ठरविले. त्यावेळी त्याच्या सोबत दिपक हिवरे, हेमंत चांदेकर, प्रणित पालीवाल, प्रेमराज सोनवाने, प्रवीण कांबळे, राजकुमार पोगळे यांनी त्या वानराला प्रगती कॉलनी गडकुंभली रोडवरील पहाडी जवळ त्याचे अंत्यविधी कार्यक्रम करण्यात आला. मुक्याप्राण्यांबद्दल आपली माणुसकी दाखवित फ्रिडमने पुन्हा माणूसकीचा परीचय दिला. आज त्यांना काही जखम झाल्यावर ते आपल्या भावना फक्त आपल्या मधेच ठेवतात. त्यांना जखम होऊन पण ते आपल्यावर उपचार नाही करू शकत.आणी तडफडून मरून जातात. अश्या मुक्का प्राण्यांबदल थोडं माणसांनी आपली माणुसकी दाखवावी अशी विनंती फ़्रिडमचे अध्यक्ष किशोर बावणे यांनी नागरिकांना केली आहे.