कलार समाज अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत…
सर्व प्रथम माझ्या कलार समाजाचे आराध्य दैवत भगवान सहस्त्र बाहू अर्जून राजराजेश्वर जी यांना वंदन करते तसेच होऊन गेलेल्या सर्व महाविभूतींना कोटी, कोटी विनम्र अभिवादन करते. ह्या भारतभूमीत अनेक जातीधर्माचे लोक राहत आहेत कोणी सुखाने जगत आहेत तर कोणाला अजूनही न्याय मिळत नाही ,कोणी आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत असे अनेक प्रश्न अनेकांचे आहेत. त्यात असलेला एक कलार समाज सुध्दा आहे. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झाले तरीही कलार समाजाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात अजूनही न्याय मिळाला नाही हि फार मोठी शोकांतिका आहे.
आज सध्याच्या परिस्थितीत बघायला गेले तर महाराष्ट्र राज्यात कलार समाजाची लोकसंख्या ३० लाख एवढी आहे अनेक राज्यात सुध्दा कलार समाज जास्त प्रमाणात आहेत पण,कुठेतरी या समाजाचा शासनाला विसर पडलेला दिसत आहे. कलार समाज ओबीसी वर्गात येतो याच समाजात बहुसंख्य तरूण, तरूणी सुशिक्षित बेरोजगार आहेत तर ग्रामीण भागात राहणाऱ्या काही मुलींना बारावी नंतरचे शिक्षण इच्छा असून सुद्धा घेता येत नाही कारण पुढच्या शिक्षणासाठी त्यांना वसतिगृहे उपलब्ध नाही, कोणी एवढे गरीब आहेत की, दोन पुस्तके घ्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत सोबत अशा अनेक प्रकारच्या अडचणी आहेत त्या शासनाच्या दारापर्यत पोहोचून सुद्धा पोहचत नाही. खास करून कलार समाजाची एवढी मोठी लोकसंख्या असतांना सुद्धा स्वतंत्र महामंडळ नाही, कोणत्या सोयी नाहीत आणि जर मागायला गेले तर पूर्णपणे पाठ फिरवली जाते हे असे, कसे होऊ शकते. ..? याच मातीत मुठभर लोकसंख्या असलेल्या समाजाला महामंडळ उपलब्ध होऊ शकते हि चांगली गोष्ट आहे पण, कलार समाजाची एवढी लोकसंख्या असतांना सुद्धा का बरं मिळू शकत नाही. ..? ते भारतीय नागरिक नाहीत का…? आणि असही नाही की,कलार समाज झोपला आहे. मागे एकदा कलार समाजाला न्याय मिळावे यासाठी कलार समाजातील बहुसंख्य लोक एकत्र येऊन नागपूर येथे आंदोलन केले होते, शासनाकडे आपल्या समस्या, अडचणी मांडल्या होत्या पण, त्याचा काहीही फायदा झालेला दिसून येत नाही.
त्यात पुन्हा एक अशी महत्वाची गोष्ट आहे की, मागे काही महिन्या पूर्वी अमरावती येथे कलार समाजाच्या वतीने भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या,कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आले होते हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी त्याच कार्यक्रमात जे भाषण दिले होते सर्वांनी ऐकले आहेत पण,लगेच तीन दिवसात असे काय झाले की, कळलेच नाही मुठभर लोकसंख्या असलेल्या समाजाला महामंडळ मिळाले पण, कलार समाजाचे नाव पूर्णपणे वगळण्यात आले हा खूप मोठा अन्याय शासनाने कलार समाजावर केलेला आहे. म्हणून आज सर्ववर्गिय कलार समाजातील सर्व बंधू, भगिणींनी एकत्र येणे हि अत्यंत काळाची गरज आहे .
आज एवढे प्रयत्न करून सुद्धा कलार समाजाला योग्य तो,न्याय मिळत नसेल तर उद्या येणाऱ्या भावी पिढीला काहीच मिळणार नाही असाच अन्याय सहन करत रहावे लागेल वेळ आली तर दारोदारी फिरावे लागेल कदाचित त्या वेळी कोणी वाली धावून येईलच असे नाही म्हणून आज आपल्यासाठी, आपल्या हक्कासाठी,आपल्या लेकरांसाठी, विकासासाठी,आपल्या कलार समाजासाठी योग्य तो न्याय मिळावा यासाठी कलार समाजातील सर्व लोकांनी लढले पाहिजे शासनाला आपली एकता दाखवली पाहिजे कलार समाजाचा शासनाला पूर्णपणे विसर पडलेला आहे त्याची आठवण काढून द्यायला पाहिजे कारण निवडणुकीत जसे इतर समाजातील लोक मतदान करतात तसेच कलार समाजातील सुद्धा लोक मतदान करतात आणि निवडून देतात पण,एकदा का ते निवडून आले की, विसरून जातात म्हणून पुढे होणाऱ्या निवडणुकीत मतदान करतांना जरा विचार केले पाहिजे.
आजपर्यंत कलार समाजावर असल्या प्रकारचे अन्याय खूप झाले आहेत पण,पुढे हेच अन्याय सहन करण्याची वेळ येणार नाही यासाठी सर्ववर्गीय कलार समाजातील लोकांनी एकत्र आले पाहिजेत,जागे झाले पाहिजेत ही हाक केद्रशासनापर्यत सुद्धा गेली पाहिजे इतर समाजाला जसे स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे तसेच कलार समाजाला सुद्धा स्वतंत्रपणे जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, हक्क मागण्याचा अधिकार आहे जसे मतदान अधिकाराने केला जातो तसच आपला हक्क ,न्याय मागण्याचा अधिकार सुद्धा कलार समाजातील लोकांना आहे.
असेही नाही की, कलार समाज जागा नाही आज कलार समाज जागतांना पाहून आनंद आहेच म्हणून मागे गडचिरोली, भंडारा,गोंदिया, नागपूर, चंद्रपूर ,नाशिक तसेच छत्तीसगढ़, मध्यप्रदेश व इतर जिल्ह्यात इतर राज्यात कलार समाजाच्या हितासाठी सर्वजण एकत्र येऊन कार्यक्रम घेत आहेत, अशीच पुढेही वाटचाल कायम राहीली पाहिजेत आपला कलार समाज जगाला कळला पाहिजे त्यासाठी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी असेच पुन्हा सर्वांनी मिळून सहकार्य करावे, एकमेकांचा सल्ला, मार्गदर्शन, एकता समाजासाठी आवश्यक आहे.
मागे एकदा नाशिक येथे कलाल,कलार संघटनेच्या वतीने भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच येत्या २० ऑगस्टला परतवाडा अमरावती येथे महाराष्ट्र कलाल,कलार समाजाच्या वतीने मूर्ती लहान किर्ती मोठी या, म्हणी प्रमाणे नवयुवक तरुण सागर समुद्रवार, श्री. संतोष खंबलवार यांच्या संपूर्ण टिमच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या आयोजनासाठी मनपूर्वक अभिनंदन करते आणि या कार्यक्रमासाठी कलार समाजातील बहुसंख्य बंधू, भगिनींनी वेळात,वेळ काढून उपस्थिती दर्शवावी कारण आपल्या समाजाला न्याय हवा आहे आणि ह्या न्यायासाठी विचार विनिमय, एकता फार आवश्यक आहे कारण आपला कलार समाज अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे योग्य तो न्याय मिळालाच पाहिजे यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आपापसातील मतभेद विसरून जावे, हक्कासाठी लढले पाहिजे आपण अभिमानाने मी कलार समाजातील माणूस आहे असे इतरांना सांगत असतो तसच हक्काने लढले पाहिजे ही सर्वांची जबाबदारी आहे आज आपण एकत्र आलो तर पुढे अडचण जाणार नाही व कोणाकडे हात पसरविण्याची वेळ येणार नाही.
सौ.संगीता संतोष ठलाल
मु. कुरखेडा जि. गडचिरोली
७८२१८१६४८५