चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशनच्या दोघा संचालकांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल

अश्विन गोडबोले

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

मो: 8830957351

चंद्रपूर, 19 ऑगस्ट: चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशनच्या दोघा संचालकांविरुध्द शासकिय रकमेच्या अपहारप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी सचीन उत्तम शिन्दे, विभागीय वन अधिकारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यांच्या तक्रारीनुसार 10/12/2021 ते 17/08/2023 दरम्यान ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीचे ऑनलाईन बुकींग करण्याकरिता अभिषेक विनोदकुमार ठाकुर तसेच रोहीत विनोदकुमार ठाकुर दोन्ही रा. गुरुद्वारा रोड चंद्रपूर यांचे चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन व कार्यकारी संचालक ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर यांच्या दरम्यान 10/12/2023 रोजी सर्विस लेवल अर्गिमेंट द्वारे अटी व शर्तीवर कायदेशीर करार झाला होता. परंतु या आरोपी कंपनी / संस्थेच्या भागीदारानी करारनाम्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन केले.

• ताडोबा जंगल सफारी बुकिंग रकमेच्या रकमेत घोळ 

• शासकिय रकमेच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल 

त्यावरुन ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर (टी.ए.टी. आर.) तर्फे सन 2020-21, 2021-22, 2022-23 व सन 2023-24 या वर्षाचे ऑडीट करण्यात आले. त्या ऑडीट अहवालात नमुद कालावधीमध्ये आरोपी कंपनी / संस्थेने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर यांस 22,80,67,749/- रुपये देणे होते. त्यापैकी त्यांनी 10,65,16,918 /- रु. भरणा केला आहे. सफारी बुकींगची उर्वरीत रक्कम 12,15,50,831 /- रुपये टी. ए. टी. आर. ला भरणा न करता आरोपी कंपनी / संस्थेच्या भागीदारानी करारनाम्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन करुन विश्वासघात करुन रुपये 12,15,50,831 / शासकीय रक्कमेचा अपहार केला. अशा $42 12,15,50 तक्रारीवरुन पोलीस स्टेशन रामनगर येथे चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशनचे संबंधीत आरोपी अभिषेक विनोदकुमार ठाकुर व रोहीत विनोदकुमार ठाकुर या दोघांवर पोलीस स्टेशन रामनगर अपराध क्रमांक 937 / 2023 भादंवी कलम 420, 406 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here