मुंबईतील @bazkinazar फोटोग्राफरला रस्त्यावरील पाण्याच्या डबक्यामध्ये बुद्धांची छोटी मूर्ती सापडली. तिथून सुरु झाला त्याचा हरवलेल्या बुद्धांना शोधायचा प्रवास. हा प्रवास त्याने सादर केलाय आपल्या बुद्धांच्या शोधात ( In Search Of Buddha) या अल्बममधून…

मनोज कांबळे: मुंबई-पुण्याचा परिसर एकेकाळी बौद्ध धर्म आणि तत्त्वज्ञानाची प्रमुख केंद्र होता. येथील बौद्ध लेण्याना केवळ धार्मिक नाही तर कला, स्थापत्यशास्त्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. पण हे प्रशासनाने आणि जनतेने समजून घेतले आहे का? दुर्दैवाने नाही असेच म्हणावे लागेल.

या प्राचीन लेण्यांमधील बुद्धमुर्त्या, कलाकुसर यांची पडझड होऊ नये आणि अनेक दुर्लक्षित लेण्यांची डागडुजी करण्याची आज तातडीने गरज आहे. अन्यथा कोट्यवधींचे नवीन पुतळे उभारताना अनमोल असा हा प्राचीन लेण्यांचा ठेवा मात्र नष्ट होताना पाहावा लागणार आहे.

सुट्यांमध्ये, फिरण्यासाठी स्थानिक लोक, पर्यटक मुंबई – पुण्यातील बौद्ध लेण्यांमध्ये भेट देतात. पण बहुतेकदा हि सेल्फी काढणे, रिल्स बनवणे यामध्येच पर्यटक मग्न असतात. बौद्ध लेण्यांचा इतिहास, बौद्ध तत्त्वज्ञान आणि स्थापत्यशास्त्र यांची माहिती जाणून घेणे, याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होते. यासाठी प्रशासनाने योग्य योजना आखून मुंबई – पुण्यातील बौद्ध लेण्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटन स्थळे बनविण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरु केले पाहिजे. अन्यथा जगभर बुद्धांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशातच बुद्धांचा ठेवा नष्ट होताना पाहण्याची जबाबदारी आपल्यावर ओढवू शकते.

या फोटो अल्बममधील फोटोग्राफर @bazkinazar याने काढलेल्या फोटोंमधून प्राचीन बौद्ध स्थापत्यशास्त्राचा अमूल्य ठेवा आणि त्याचबरोबर दुर्लक्षित राहिल्याने झालेले नुकसानीचे विदारक चित्र आपल्याला दिसून येते. 

अल्बममधील काही अप्रतिम फोटो:

 

 

भारतातील बौद्ध लेण्यांच्या संवर्धनासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या, याबाबत आपली मत नक्की कंमेंट करा.

हा अल्बम तुम्हाला कसा वाटलं नक्की कळवा? या अल्बमच्या फोटोग्राफरचे असेच अप्रतिम फोटो पाहण्यासाठी क्लिक करा.

ट्विटर: @bazkinazar   |  इंस्टाग्राम: instagram.com/bazkinazar/  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here