मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे रस्त्याच्या बाजूला मगरीचा मुक्त संचार
रायगड जिल्हा प्रतिनिधी
निलेश महाडिक
मो.7722040387
काल दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी रात्री दहाच्या सुमारास माणगाव शहरामध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती (क्रमांक 66)’ राऊत हॉस्पिटलच्या समोर एका नागरिकाला एक भली मोठी मगर रस्त्यात शेजारी पाण्याच्या टप्प्यात दिसून आली. यांनी तात्काळ वन्यजीव अभ्यासक व SVRSS टीमचे सदस्य शंतनु कुवेस्कर यांना माहिती दिली,शंतनू यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली.काही वेळेतच (SVRSS×RESQ)रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली व मगरीचे रेस्क्यू करण्यात आले. वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पशुवैद्यकीय केंद्र येथे मगरीची प्राथमिक तपासणी करण्यात आली. अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये मगर जखमी झाली होती. तिला तातडीने उपचाराची आवश्यकता होती. मुख्य वनसंरक्षक (Chief Conservator of Forests) Shri. Praveen N.R. यांनी पुढील उपचारा करिता (SVRSS×RESQ)टीमला परवानगी दिली. मगरी वरती RESQ TTC पुणे येथे उपचार चालू आहेत….