पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार

58

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961

उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते कोरोना कार्यकाळात कार्य करणाऱ्या सामाजिक व इतर क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार, गौरव अखिल भारतीय ग्राहक पंचायत उस्मानाबादच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात काल करण्यात आला.
यात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांचे प्रतिनिधी डि.वाय.एस.पी.मोतीचंद राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी चारुशिला देशमुख, नायाब तहसीलदार राजाराम केरुलकर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील, डॉ.संतोषजी पाटील, डॉ.आळंगेकर,अन्नपुर्णा ग्रुपचे अतुल अजमेरा आणि सर्व सदस्य, श्रीमती मनिषा वाघमारे आदींचा शाल, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, असंघटित कामगार काँग्रेसचे संजय गजधने,अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष अनिलजी पाटील, अंकुश उबाळे , जिल्हा सचिव विजय बंग ,प्रांताध्यक्ष संपत जळके , सेवानिवृत्त पोलिस अधिकारी दिलीप जगताप पाटील आदी उपस्थित होते .