उस्मानाबाद: राज्यात शेतकरी मदत कक्ष दिशादर्शक ठरेल: पालकमंत्री शंकरराव गडाख

60

उस्मानाबाद: राज्यात शेतकरी मदत कक्ष दिशादर्शक ठरेल: पालकमंत्री शंकरराव गडाख

शेतकरी प्रश्न सोडवण्यासाठी आशादायक पाऊल

उस्मानाबाद: राज्यात शेतकरी मदत कक्ष दिशादर्शक ठरेल: पालकमंत्री शंकरराव गडाख
उस्मानाबाद: राज्यात शेतकरी मदत कक्ष दिशादर्शक ठरेल: पालकमंत्री शंकरराव गडाख

मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यूज -8208166961

उस्मानाबाद :- गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांवर संकटांची मालिका सतत सुरू आहे. कोरोनाच्या वेगवेगळ्या लाटा, अवकाळी पाऊस, शेतमालाला भाव न मिळणे, वाढलेले खते-बियाणेचे दर, वाढलेली महागाई, आर्थिक चिंता अशा एक ना अनेक प्रश्न बळीराजाच्या मागे हात धुवून लागले आहेत.तरी यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत . त्यात हे शेतकरी मदत केंद्र राज्यास मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज येथे केले .
जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या शेतकरी मदत केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.शेतकऱ्यांच्या शेती विषयक, शासकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय, शासकीय योजना इत्यादी पातळीवर शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी प्रशासकीय पातळीवर समन्वयातून सोडवण्यासाठी स्वतंत्र शेतकरी सहाय्यता कक्ष स्थापन केले आहे. यासाठी, शिवार संसद युवा चळवळ संचलित शिवार फौंडेशन मागील सहा वर्षांपासून अविरतपणे उपलब्ध साधनामधून जिल्ह्यातील शेतकरी, शेतीचे प्रश्न सोडवून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी शिवार हेल्पलाईन संकल्पना राबवुन मोलाची भुमिका बजावत आहे. यांचीच दखल जिल्हा प्रशासन पातळीवर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेऊन निती आयोगाच्या आकाक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत ही संकल्पना सक्षमपणे राबविण्यासाठी पुढाकार घेतला. शिवार फाउंडेशन मार्फत विनामुल्य तांत्रिक मदत, सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध करुन दिली आहे.

वर पाहता हे प्रश्र्न नेहमीच्या स्वरूपाचे वाटू शकतात पण याचमध्ये, जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी ठरू शकतो असे शेतकरी सामावलेले आहेत. या सर्व प्रश्नांची समुपदेशनाद्वारे माहिती, सल्ला, मार्गदर्शन देऊन मार्ग दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या निमित्ताने हे अधोरेखित होते कि, शेतकरी आत्महत्या या नक्कीच थांबू शकतात, ज्या पद्धतीने उस्मानाबाद जिल्ह्यात एकत्रित सर्व पातळीवर समन्वयातून उपाययोजना राबविण्यास येत आहेत, आत्महत्यामुक्त जिल्ह्यानंतर आत्महत्यामुक्त महाराष्ट्र होणे दूर नाही असे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले.

याशिवाय, आत्महत्येच्या विचारातून मानसिक समुपदेशन करून शेतकऱ्यांना बाहेर काढले जात आहे, असे शिवार फाऊंडेशनचे प्रमुख श्री विनायक हेगाणा यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा असे आवाहन पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी केले. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे.
यासाठी कृषी विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, राष्ट्रीय सेवा योजना, मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी एम.एच.आय या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी संस्था सर्वांचे सहकार्य मिळत आहे. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, जि. प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, कृषी उपसंचालक अधिकारी उपेंद्र काशीद, कृषी सहायक सुमित सोनटक्के उपस्थित होते.