कारंजा येथे भाजपच्या वतीने पंतप्रधान, मानरेंद्रजी मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

अजय उत्तम पडघान

8554920002

कारंजा :- दि 17 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमीत्य देशभरात आयोजित केलेल्या सेवा पंधरवाडा अंतर्गत भाजपाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजनकरण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उदघाटन कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्रजी पाटणी यांचे शुभ हस्ते संपन्न झाले. या रक्तदान शिबिरात 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

महेश भवन येथील या कार्यक्रमात आमदार राजेंद्रजी पाटणी व माजी नगराध्यक्ष नरेंद्रजी गोलेच्छा यांनी उपस्थीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर सर्वश्री आमदार राजेंद्र पाटणी, माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे, भाजपा शहर अध्यक्ष ललित चांडक, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष विजय काळे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सौ. मीनाताई काळे ईत्यादी मान्यवर उपस्थीत होते.

कार्यक्रमास भाजपाचे, आघाड्याचे, सेलचे सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते. तसेच कारंजा स्थित भाजपा जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थीत होते. कार्यक्रम संचलन सौ मेघाताई बांडे यांनी केले. शिबिराचे यशस्वीतेसाठी भाजप ग्रामीण, शहर, युवा मोर्चा, महिला आघाडी व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. जिल्हा उपाध्यक्ष अनील कानकिरड, तालुका उपाध्यक्ष राजीव भेंडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मंगेश धाने, शहर युवा मोर्चा अध्यक्ष अमोल गढवाले, समीर देशपांडे, मोहन पंजवानी, सविज जगताप, जिल्हा संयोजक महिला मोर्चा सोशल मीडिया सौ सविता ताई काळे, मेघाताई बांडे, सौ शुभांगीताई पिंपळे, सौ रेखाताई लांडे, सौ बांडे, पं स सदस्य शुभम बोनके, पं समिती सदस्य दिनेश वाडेकर, तालुका सरचिटणीस श्रीकृष्ण मुंदे, संकेत नाखले, सचिन काळे, माजी तालुका अध्यक्ष निरंजन करडे, ता उपाध्यक्ष रामकीसन चव्हाण, ललित तिवारी, शहर सरचिटणीस रोतले, सोशल मीडिया संयोजक जिग्नेश लोढाया सचिन कानोजे, राजु घोडे, राजू गाढवे, राहुल रवीराव, दिवाकर हिंगणकर, अतुल धाकतोड, किशोर धाकतोड, अक्षय बापू देशमुख, तापडिया, अड, विजय बगडे, सुरेश गिरमकार, हर्षल काटोले, विजय राऊत ईत्यादीसह अन्य नागरीक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने प्रामुख्याने उपस्थीत होते .

वाशिम येथील सौ कांताताई डाळे ब्लड सेंटर यांच्याकडे ब्लड देण्यात आले तसेच कारंजा येथील रक्त दान चळवळीचे कार्यकर्ते प्रज्वल गुलाकारी यांनी सहकार्य केले.असे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार पाटणी यांचे स्वीय सहाय्यक संजय भेंडे यांनी कळविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here