फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये नेणाऱ्या सरकारच्या विरोधात धरणा आंदोलन
गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०
मुंबई– सरकारच्या अश्या भूमिकेच्या जाहीर निषेधार्थ भारतीय लोकसत्ताक बेरोजगार महासंघाच्या वतीने दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी शनिवार दुपारी तीनच्या दरम्यान बहुसंख्येने तरुणांच्या उपस्थित बांद्रा_पश्चिम_डेपो_जवळ धरणा_आंदोलन_करण्यात_आले.
महाराष्ट्राच्या जनतेस कळविण्यात येते की, फॉक्सकॉन_प्रकल्प (Foxcon Project) महाराष्ट्रात १.५८ लाख_कोटी_रुपयांची
गुंतवणूक करणार होता. या प्रकल्पातून_एक_लाख रोजगार_निर्माण_होणार_होते. एवढा मोठा प्रकल्प_गुजरातला_गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांनीफक्त सणवार साजरे करून घरीच बसायची वेळ आज सरकार ने प्रत्येक नागरिकांन वर आणली आहे, देशातील बेरोजगारांची संख्या पाहता त्यांची अर्धी बेरोजगारी महाराष्ट्रात आहे. तरी सुद्धा रोजगार देणारा प्रकल्प गुजरातला नेला आणि महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगारच ठेवले.
म्हणून सरकारच्या अश्या भूमिकेचा जाहीर निषेध…!करण्यात आला.
भारतीय लोकसत्ताक बेरोजगार महासंघाच्या प्रमुख_मागण्याः
👇👇👇👇👇
१) महाराष्ट्रात रोजगारासाठी मोठमोठे प्रकल्प झाले पहिजेत, एक ही प्रकल्प बाहेर जाता कामा नये.
२) प्रत्येक प्रकारच्या बेरोजगारांची नोंद झालीच पाहिजे.
३) एम्प्लॉमेंट एक्सचेंज ही सुविधा सुरु झालीच पाहिजे.
४) बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी कोणतीही अट न ठेवता कर्ज उपलब्ध करुन देणे.
५) बेरोजगारांना कोणत्याही रोजगारासाठी मोफत मध्ये लायसन्स उपलब्ध करून देणे.
६) प्रत्येक प्रकारच्या बेरोजगाराला त्यांच्या शिक्षणाप्रमाणे आणि कौशल्यप्रमाणे रोजगार भत्ता
(सुरुवात फक्त १५०००/- रुपये) देण्यात यावा…
७) देशात-महाराष्ट्रात खाजगी तसेच शासकीय कंपण्यांचे केंद्रीय HR पोर्टल असावे जेणेकरून जेव्हा रोजगार संधी असेल तेव्हा महाराष्ट्रात सर्वांपर्यंत रोजगाराची संधी उपलब्ध होईल. अश्या प्रमुख मागण्या सरकारने मान्य कराव्या.
सदर निषेधार्थ धरणे आंदोलनामध्ये बेरोजगारांवर आणि महाराष्ट्रावर झालेल्या अन्यायाबाबत सक्रिय सहभागी होऊन आपली महत्वाची जबाबदारी म्हणून तरुणांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवली होती त्या सर्वांचे तसेच पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आले.