यारी दोस्ती ग्रुप कडून सागपाणी येथील गरजू कुटुंबातील मुलींना शैक्षणिक मदत
सुनिल जाबर
जव्हार प्रतिनिधी
जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेली वावर वांगणी ग्रामपंचायत मधील सागपाणी येथील प्रमिला वसंत हलकारी यांच्या कुटुंबातील ०२ मुलींना यारी दोस्ती फाउंडेशन कडून आज दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजी शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली.
या कुटुंबात कमावती व्यक्ती कुणीही नाही, कुटुंबातील वसंत कासू हलकारी हे रोजगारासाठी ठाणे येथे गेले असताना परत येत असताना वाडा येथून हरवले आणि पुन्हा घरी परतलेच नाही. त्यामुळे त्या कुटुंबात कमावती व्यक्ती कुणीच नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत संपूर्ण कुटुंब चालवणे कठीण झाले. या कुटुंबात एकूण ७ सदस्य आहेत. या कुटुंबाला मदत मिळावी म्हणून गावातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल जाबर याने यारी दोस्ती ग्रुप ला “मदत मिळावी” असा ईमेल केला होता. हा मेल बघून ग्रुप कडून मदत करण्याचे ठरविले.
या कुटुंबात योगिता वसंत हलकारी (११ वर्षे) इयत्ता ५ वी आणि रिना वसंत हलकारी (९ वर्षे) या दोन मुली शिक्षण घेत आहेत. म्हणून या मुलींना यारी दोस्ती ग्रुप कडून शैक्षणिक साहित्याची मदत केली. या मदतीमध्ये स्कूल बॅग, वह्या, पेन, पेन्सिल, पाटी, पाणी बॉटल, चप्पल इत्यादी साहित्य देण्यात आले. ही मदत जरी छोटीशी असली तरी या मदतीमुळे त्या कुटुंबातील मुलींना आणि आईला खूप आनंद झाला. ही मदत यारी दोस्ती ग्रुप मधील सदस्यांनी निस्वार्थ भावनेने सामाजिक कर्तव्य म्हणून स्वतः निधी जमा करून मदत केली. ही मदत केल्या मुळे त्या कुटुंबाने यारी दोस्ती ग्रुपचे आभार मानले.