यावल येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार व आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

मन्सूर तडवी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

यावल येथे सालाबाद प्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या सत्कार समारंभाला

आदिवासी गाव, पाडे, किंवा बहुसंख्य आदिवासी विद्यार्थी असलेल्या शाळेत विद्यादान करणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा पुरस्कार. 

आसेम आदिवासी सेवा मंडळ,मुख्य कार्या.-सावदा ता.रावेर जि. जळगाव.(म.रा) यांचे तर्फे आद्य क्रांतीकारी तंट्या मामा भिल आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येत आहे निवड करण्यात आलेली यादी खालील प्रमाणे

1)मा.राजु इब्राहिम तडवी रि.शि. वि.अधिकारी. मुक्ताईनगर (तत्कालीन शिक्षक असतांना ) 

2)मा.श्री.चंद्रशेखर नवनाथ पाटील उपशिक्षक व प्र.के. प्र. न्हावी. ता. यावल

3)मा.एम.एच.तडवी के.प्र.कठोरा ता. यावल

4) मा.सौ.पुनम केतन महाजन उपशिक्षिका जि.प.फैजपुर ता. यावल

5)मा.सौ.कल्पना देविदास माळी उपशिक्षिका जि. प. परसाडे ता. यावल

6) मा.श्री.निलेश अशोक पाडवी उपशिक्षक जि.प.चिंचोल ता. मुक्ताईनगर

7) मा. सलीम नथ्थु तडवी, मुख्याध्यापक सौखेडा बु. ता. रावेर

8)मा.श्री.विश्वास झेलसिंग पावरा उपशिक्षक जि. प.अम्मलवाडी ता. चोपडा

9) मा.शरीफ मासुम तडवी उपशिक्षक जि.प. शाळा-वरगव्हान ता. चोपडा

10) मा. जावेद याकुबखॉ तडवी पदविधर शिक्षक जि.प. माध्यमिक शाळा-भिंगारा जि-बुलढाणा तसेच शिक्षणाला पर्याय नाही या अनुषंगाने आसेम परिवारच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षात किमान 2000 आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा कार्यक्रम आयोजित केला आहे परंतु विद्यार्थ्यांच्या गौरव करून प्रोत्साहन देत असताना शिक्षकांच्या आदर मान सन्मान आभार मानून प्रस्तावित करणे तितकेच महत्त्वाचे होते म्हणून आद्य क्रांतिकारक धरती आबा तंट्या मामा भील आद्य शिक्षक पुरस्कार ची सुरुवात करून बहुसंख्य आदिवासी विद्यार्थी असलेल्या शाळांवरील शिक्षकांना पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन करण्याच्या गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न सुरू आहे.

यात वर्षा गणित खूप बदल होणार असून नेहमीप्रमाणे समाजविकासासाठी अनेक उपक्रमाप्रमाणे या महत्त्वाच्या विषयाला ही सुरुवात केली आहे यात मोठे बदल होणार हे निश्चित आहे रविवारी दिनांक 24/ 9/ 2023 रोजी पंचायत समिती हॉल यावल येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी परिसरातील पालक शिक्षक विद्यार्थी व समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वांचे मनोबल वाढवावे अशी आसेम परिवाराकडून विनंती करण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here