रायगड जिल्ह्यात ४६ हजार नवमतदार

रायगड जिल्ह्यात ४६ हजार नवमतदार

पहिल्यांदाच करणार विधानसभेला मतदान: २०१९ पेक्षा वाढले अडीच लाख मतदार

रायगड जिल्ह्यात ४६ हजार नवमतदार

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी जिल्हा निवडणूक विभागाने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली. यात यंदा ४६हजार ६४३ नव मतदारांची नोंद झाली आहे.
२०१९ पेक्षा आता अडीच लाख मतदारांची वाढ झाली आहे.पनवेल विधानसभा मतदारसंघात १ लाख १९ हजार ४४३मतदार वाढले आहेत. तृतीयपंथी मतदारांमध्ये ८८ ने वाढ झाली आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार हे निवडणुकीनंतर कळणार आहे.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल दिवाळीनंतर वाजण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अपडेट करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याधिकारी किसन जावळे यांनी काही दिवसापूर्वी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली होती .

४६ हजार ९३७ अर्ज

१)२५ जून २०२४ पासून विधानसभा मतदारसंघात विशेष मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार ६ ते २० ऑगस्ट दरम्यान नवीन नाव वाढविणे, एन.आर. आय नोंदणी, नाव कमी करणे, नाव बदलणे यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती.
२) या प्रक्रियेत ४६हजार,९३७ अर्ज दाखल झाले होते. यापैकी २९ हजार ७६० अर्ज मंजूर झाले असून १२हजार ८९० अर्ज बाद करण्यात आले आहेत. २१६अर्ज प्रलंबित असल्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी सांगितले.

१०१ मतदान केंद्राची झाली वाढ

रायगड जिल्ह्यात सात मतदारसंघात २०१९ रोजी २६९४ मतदान केंद्रीय होती. यामध्ये आता १०१ नवीन मतदान केंद्राची वाढ झाली आहे. त्यामुळे आता २७९० मतदान केंद्र झाले आहेत.

२४लाख ४६ हजार १५३ एकूण मतदार
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अपडेट करण्यात आलेली आहे. रायगड जिल्ह्यात सात मतदारसंघात १२ लाख ४० हजार ५६२ पुरुष १२ लाख ५५०० महिला ९१ तृतीयपंथी असे एकूण २४ लाख ४६ हजार १५३ मतदार आहेत १८ ते १९ वयोगटातील २६हजार४५८ पुरुष ,२० हजार १७९ महिला, ६ तृतीयपंथी असे ४६ हजार ६४३नवमतदारांची नोंदणी झाली आहे. रायगड जिल्ह्यात सात मतदारसंघात ७ हजार ७२२ पुरुष, ५हजार2?२४० महिला असे एकूण १२हजार९६२ दिव्यांग मतदार आहेत ८० वर्षावरील ३१ हजार ४९८ पुरुष, ४० हजार ९७३ महिला असे ७२ हजार ४७१ मतदार आहेत.
विधानसभा २०१९ ते २०२४झालेली वाढ
१)पनवेल २०२४-६,३४,१९७, २०१९-५,१४,७५४ झालेली वाढ १,१९,४४३
२)कर्जत-२०२४-२,७५,४१२,२०१९-२,७५,४१२ झालेली वाढ ३८,४७२
३)उरण -२०२४-३,३४,४३१/२०१९-२,८६,६१९ झालेली वाढ ४७,८१२
४)पेण-२०२४-३,०५,५१८/२०१९-२,९७,८७० झालेली वाढ ४,३९८
५)अलिबाग -२०१४-३,०२,२६८/२०१९-२,८८,७७१ झालेली वाढ १३,४९७
६) श्रीवर्धन – २०२४-२,६३,०७१/२०१९-२५४३८१ झालेली वाढ ८६९०
७)महाड – २०२४-२,९२,७८३/२०१९-२,८२,४५२ झालेली वाढ १०३३२..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here