चोरट्या ने28 ग्रॅम सोन्याचे दागिने केवळ 35 हजार रुपयांत विकले

28

चोरट्या ने28 ग्रॅम सोन्याचे दागिने केवळ 35 हजार रुपयांत विकले

त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो 9096817953

नागपूर.सोन्याचा दर सध्या एक लाख 13 हजार रुपये तोळे आहे. जर कोणी 13 हजार रुपये तोळे या दराप्रमाणे दागिने विक्री करीत असेल तर, आश्चर्य वाटेल, परंतु हे खरे आहे! एका चोराने घरफोडी करून 28 ग्रॅम सोन्याचे दागिने केवळ 35 हजार रुपयांत म्हणजे कवडीमोल भावात सोनाराला विकले.वाठोडा ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरीशकुमार बोराडे यांचे प्रयत्न आणि कौशल्याने आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या, तसेच सोनाराकडून दागिने जप्त करण्यात आले. मोहम्मद शब्बीर ऊर्फ सप्पू वर्ल्ड मोहम्मद अयुब (24) रा. वनदेवी नगर, यशोधरानगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

शब्बीर हा आधी ऑटोरिक्षा चालक होता. ऑटो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. मात्र, ऑटो चालवून केवळ पोट भरता येते. भौतिक सुख सुविधा मिळविता येत नाही. त्यामुळे त्याने ऑटो विकला आणि जुनी कार खरेदी केली. कारने फिरून तो चोरी करायचा. 26 ऑगस्टला त्याने वाठोडा ठाण्याच्या हद्दीतील आराधनानगरात घरफोडी केली. भाग्यशाली सत्येय (40) यांच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीने सत्येय यांच्या घरून 28 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले. यशोधरानगरातील एका सोनाराकडे केवळ 35 हजारांत दागिन्यांची विक्री केली. मिळालेल्या पैशांवर मौजमस्ती केली. मनपसंत खाद्यावर पैसे उधळले. कपडे खरेदी केले.पोलिसांनी आरोपीकडून एक कार, तसेच सोनाराकडून दागिने असा एकूण 9 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनात वपोनि हरीशकुमार बोराडे, तपास पथक प्रमुख स्वप्निल राऊत, माधव गुंडेकर, अतुल पवार, अश्विन बडगे, सुनील वानखडे, मिलिंद, जितेंद्र, प्रफुल्ल, रोशन, महेंद्र, चकोले यांनी केली.

अडीचशे सीसीटीव्ही फुटेज तपासले

आरोपी कारने आले होते आणि कारवर काळा पट्टा होता, एवढीच पोलिसांजवळ माहिती होती. पोलिसांनी जवळपासचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच शहरातील टोल नाक्यावरील फुटेजही तपासले. मात्र, काहीच सुगावा लागला नाही. अखेर कळमना मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना काळा पट्टा असलेली कार यशोधरानगराकडे जाताना दिसली. वपोनि बोराडे यांनी पोलिसांचे एक पथक यशोधरानगरात पाठविले, तसेच गुप्त बातमीदारांकडून माहिती घेतली. तीन दिवस पाळत ठेवल्यानंतर ती एका आरोपीच्या घरी दिसली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. 28 ग्रॅम दागिने एका सोनाराकडे विकल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी सोनाराकडून संपूर्ण दागिने जप्त केले. त्यामुळे सोनारालाही 35 हजारांचा फटका बसला. सखोल चौकशीत आणखी एक गुन्हा उघडकीस आला.

उपायुक्त राव यांची कल्पकताघरफोडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपायुक्त रश्मिता राव यांनी घरफोडी प्रतिबंधक पथक तयार केले. पथकाचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला. रात्री गस्तीवर जाणारे पथक ग्रुपवर लोकेशन आणि फोटो टाकते. काय कारवाई केली त्याची माहिती सुद्धा दिली जाते. त्यामुळे वाठोडा हद्दीत 25 दिवसांत एकही घरफोडी झाली नाही.