Home latest News महानगरपालिकेच्या पारडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीर आयोजित
महानगरपालिकेच्या पारडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीर आयोजित
✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो. 9373959098
नागपूर :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे की केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष राष्ट्रीय अभियाना अंतर्गत शुक्रवारी (ता.१९) नागपूर महानगरपालिकेच्या पारडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. आमदार श्री. कृष्णा खोपडे यांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ झाला. याप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, नगरसेवक श्री. दीपक वाडीभस्मे, माजी नगरसेविका श्रीमती वैशाली रोहणकर, लकडगंज झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. ख्वाजा मोइनुद्दिन, पारडी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. लीना बडवाईक, श्रीमती अर्चना खडेआदी उपस्थित होते.
शनिवारी २० सप्टेंबर रोजी मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शिबिर आयोजित करण्यात आले आहे.