आपल्या प्रभागातील विकासासाठी रवीभाऊ कांबळे लढणार निवडणुक.
रवीभाऊ कांबळे ला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जनतेची साथ.

आशिष अंबादे प्रतिनिधी
हिंगणघाट:- शहरात नगर पालिका निवडणुकेचे वारे वाहू लागले आहे. अनेक तरुण आपल नशीब आजमावणारा आहे. त्यामूळे नगर पालिकेची ही निवडणूक खुप चुरशीची होण्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.
आज राजकारणी लोकांनी समाज कारणापासुन फारकत घेतल्याने प्रभागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. प्रस्थापीत जनप्रतीनिधी आप आपल्या परिसर पाहुन विकास कार्याची दखल घेऊन प्रभागातील लोकांना जेव्हा वा-यावर सोडले जाते त्यावेळी जनता नवीन होतकरू तरुणाला आपल्या प्रभागाची जिम्मेदारी भाग पाडतात. असाच एक तरुण कार्यकर्ता रवीभाऊ कांबळे हा आपल्या प्रभागातील जनतेच्या विकासासाठी झटून कार्याला लागला आहे. आपल्या परिसरातील अडल्या नडल्याच्या अडीअडचणीत धावून जाणे हा त्यांचा स्वभाव आहे. आपल्या लोकांची सेवा हे आपल साध्य आहे, हे त्यानी आपल्या मनात पक्क केल आहे.
रवीभाऊ कांबळे हे अनेक वर्षा पासून सामाजिक संघटनेत कार्यारत आहे. त्या माध्यमातून अनेक आंदोलने केली. अनेक प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केल. त्यामूळे आपल्या प्रभागात त्याच नाव सर्वाना माहित आहे. आज सर्वीकडे आर्थीक राजकारणाचे वारे वाहत आहे. त्यामूळे प्रभागाचा विकास हा खुटला आहे. त्याच मुळे रवीभाऊ कांबळे हा गरिब घरातून वर आलेला सामाजिक कार्यकर्ता आपल्या प्रभागात निवडणूक लढायला सज्ज झाले आहे आणी त्याच्या मागे जनतेची ताकत दिसून येत असल्याने अनेक उमेदवारांना आता पासुन चिंतेच वातावरण निर्माण झाल आहे.