राजगडच्या डोंगरावर वाघोबाचा संचार • गावकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण • वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी

46
राजगडच्या डोंगरावर वाघोबाचा संचार • गावकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण • वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी

राजगडच्या डोंगरावर वाघोबाचा संचार

• गावकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण
• वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी

राजगडच्या डोंगरावर वाघोबाचा संचार • गावकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण • वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

मूल : 19 ऑक्टोबर
तालुक्यातील राजगडच्या डोंगरावर पुन्हा एकदा वाघाने आपले बस्थान मांडले आहे. त्यामुळे गावकरी आणि शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील उपसरपंच चंदू पाटील मारकवार यांनी केली आहे.
दोन दिवसाआधी राजगड येथील अमोल ठाकूर याच्या एका बैलाला वाघाने हल्ला करून ठार केले. गावाच्या सभोवताल धानाची शेती आहे. खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकर्‍यांना शेतात जाणे गरजेचे आहे. पण, वाघाच्या भितीमुळे शेतकर्‍यांनी शेतात जाणे बंद केले आहे. अनेकांना वाघाचे दर्शन झाल्याने भितीपोटी शेतशिवार ओसाड पडू लागले आहे. धानाला आता पाण्याची आवश्यकता आहे, पण, वाघाच्या भितीने धानपिकाला पाणी करणे कठिण झाले आहे. वाघाच्या भितीपोटी शेती सोडायची का, असा सवाल शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.
तालुक्यात वाघासह इतर वन्यप्राण्यांचा संचार आहे. वन्यप्राण्यांच्या दर्शनाने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. गावकरी आणि शेतकर्‍यांच्या सुरक्षेसाठी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला ड्रोन कॅमेरे पुरवावे, यासोबतच वनविभागातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.