सामाजिक बांधिलकी जपणारे नंदकुमार पाटील उर्फ बाळा पाटील
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: नंदकुमार पाटील यांचा परिचय म्हणजे साधी रहाणी ,चांगले विचार,अंगमेहनत ,प्रामाणिकपणा आपल्या व्यवसायामध्ये प्रेम करणारे आणि समाजात सामाजिक आपुलकी जपणारे अजात शत्रू तसेच एक विश्वासू मित्र अशी ओळख अलिबाग तालुक्यामध्ये आहे.अशा नंदकुमार पाटील यांचा आज वाढदिवस आहे.त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नंदकुमार दामोदर पाटील यांचा जन्म २०/१०/ १९६४ रोजी विरवाडी येथे झाला.त्यांच्या आई शांताबाई पाटील वडील दामोदर पाटील ,तीन मोठे भाऊ असा कौटुंबिक परिवारात ते सगळ्यात लहान असल्याने त्यांना लहानपणापासून बाळ असे टोपण नाव आहे.त्याचे प्राथमिक शिक्षण सुतारपाडा जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण तिनविरा हायस्कूल मध्ये झाले.१९६८पासून त्यांच्या आईचा व्यवसाय पीठ मसाला दळणे हा होता. ते शाळेत सहावीला असल्यापासून आईला पीठ गिरणीमध्ये मदत करू लागले. तेव्हापासून मशिनरी खोलजोड दुरुस्ती करणे या कामाची शिकवण त्यांच्या मोठ्या भावांकडून घेऊ लागले होते. दहावीचे शिक्षण झाल्यावर कॉलेजला अकरावी मध्ये प्रवेश घेतला. पण त्यांना लहानपणापासून मिलिटरी (सैनिक)ची ओढ असल्यामुळे सैनिक होण्याची स्वप्न पाहत होते. त्यामुळे शिक्षण थांबून तिकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. पण सर्व मोठे भाऊ सरकारी नोकरीमध्ये मोठ्या हुदद्यावर होते.त्या मुळे घरच्या व्यवसाय व आई-वडिलांची देखभाल करण्याकरता घरात दुसरा कोणी नसल्याने आई-वडिलांचे आग्रहाखातर घरचाच व्यवसाय सांभाळण्याचे ठरवीले.वयाच्या १५ व्या वर्षी व्यवसायाची कमान हाती घेऊन काम चालू केले. आणि १९८४ साली भात गिरणी व्यवसाय चालू केला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने एक लाख तीस हजार रुपये स्टेट बँकेचे कर्ज घेऊन व्यवसायाला सुरुवात केली. स्वतःची अंग मेहनत,सचोटी, प्रामाणिक व्यवसायाची तत्त्व बाळगून चालल्याने त्याची प्रगती चालू झाली.
१८ मे १९८७ रोजी बहिरीचापाडा माणकुळे येथे ते वंदना म्हात्रे यांच्याबरोबर विवाहबद्ध झाले. जीवनात आनंदाचे क्षण येऊन सर्व ठीक होत असतानाच नोव्हेंबर १९८८ ला वडील हृदयविकाराने अचानक मयत झाले. लहान वयात व्यवसायाची पूर्ण जबाबदारी घेऊन व्यवसाय रमून गेले. त्यांना तीन आपत्य होऊन परिवार वाढला. वडील मयत झाल्याने त्यांची समाजात जाणे येणे चालू झाले. त्यातूनच सामाजिक कामाची आवड निर्माण झाली.
२००६ साली सरकारने बुल्स इंडिया कंपनीचा सेझ प्रकल्प अलिबाग तालुक्यात खारेपाट विभागात आणला होता. शेतकऱ्यांच्या जमिनीवर बळजबरीने खरेदी करून त्यांना विस्थापित करायचे होते. त्यांच्याविरुद्ध खारेपाटातील २२ गावांनी मिळून संघर्ष समितीची स्थापना केली होती. या समितीचे उपाध्यक्ष म्हणून नंदकुमार पाटील यांनी काम केले. मोर्चे, धरणे, रास्ता रोको, न्यायालय लढाई करून समितीला यश आले.
त्यांनी २००७ मध्ये परहुर येथे नवीन वंदना राईस मिल व्यवसाय चालू केला. व्यवसायात यशस्वी असे पदार्पण केले.विरवाडी येथील सात पाड्यांचे एक जुने जोगेश्वरी मंदिर होते. त्यांनी २००८ मध्ये या मंदिराचे जीर्णोध्दाराचे काम हाती घेतले. उदार देणगिदाराच्या देणगीतून सुंदर असे भव्य मंदिर उभे केले.
तसेच २००७ते २०१० मध्ये सलग तीन वर्ष कामार्ले ग्रामपंचायत महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. कामार्ले ग्रामपंचायतिला तंटामुक्त ग्राम अभियान मध्ये बक्षीस पात्र होण्यासाठी मेहनत घेऊन ४ लाख ५० हजार रुपये बक्षिस मिळून दिले.तसेच ग्रामपंचायतला निर्मल ग्राम पुरस्कार मिळवण्यासाठी बहुमोल कामगिरी केली.
नंदकुमार पाटील यांचे वैशिष्ट्य म्हणजे वयाच्या १८व्या वर्षापासून आजूबाजूच्या साधारण ३०ते ४० गावांमध्ये लग्नकार्य ,प्रेतयात्रा, वाढदिवस, सामाजिक सभा अशा विविध सुख दुखाच्या कार्यात ते नेहमी हजर असतात. स्वतः व्यवसाय करत असताना सर्व मुलांना उच्च पदवीचे शिक्षण दिले आहे. आजही समाजात वैवाहिकवाद,कौटुंबिक वाद ,हिस्सा वाटप किंवा सामाजिक तंटे मिटवण्याचे काम करण्याची त्यांची हातोटी आहे. या सर्व सेवा एक सामाजिक बांधिलकी म्हणून करत असतात.
२०१७ मध्ये मसाला व्यवसायात अद्यावत मशनरी आणत मोठ्या प्रमाणात काम चालू केले आहे. दरवर्षी हजारो किलो मसाला दळण्याचे काम करतात .यामध्ये त्यांच्या परिवाराचा हातखंड आहे. नंदकुमार उर्फ बाळा पाटील यांची स्वतःची ओळख अशी की साधी राहणी, चांगले विचार, आजातशत्रू असे व्यक्तिमत्व आहे. त्यांना
बाळा पाटील या टोपण नावाने जास्त ओळखले जाते. नवीन पिढी त्यांना आदराने आबा म्हणून हाक मारतात. त्यांची उच्चशिक्षित दोन मुले अभिजीत पाटील एमबीए फायनान्स तर संकेत पाटील मेकॅनिकल इंजिनिअर आहे. दोन्ही मुलांनी काही वर्ष नोकरी करून आपल्या वडिलांच्या व्यवसायात सामील झाले आहेत. नंदकुमार पाटील यांना नेहमी व्यवसाय वाढवण्याची ओढ असते त्यांनी एप्रिल २०२३मध्ये अलिबाग- वडखळ हायवे वर पळी येथे स्व वऱ्हाडी मिसळ हा हॉटेल व्यवसाय चालू केला. कोणताही अनुभव नसताना नवीन व्यवसायात पदार्पण केले. त्यांच्या दोन्ही मुलांनी नवीन व्यवसाय उत्तमपणे उभारण्याचे काम चालू ठेवले आहे. व्यवसाय कोणताही असून अपार कष्ट करून व्यवसायातील बारकावे शोधून त्याप्रमाणे काम करणे हे त्यांचे व त्यांच्या परिवाराचे यशाचे गमक आहे.अशा हरहुन्नरी व्यक्तीमहत्व असणाऱ्या नंदकुमार पाटील उर्फ बाळा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
ॲड.रत्नाकर पाटील