एस टी कर्मचार्यांना 24 तासात कामावर रूजू होण्याचे आदेश

खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतीनीधी
8378848427
शासनात विलीनीकरण करण्यासाठी मागील 21 दिवसांपासुन सुरू असलेला राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याचे चिन्ह दिसत नसल्यामुळे महामंडळाने दडपशाही सुरु केली असुन नोकरीत कायम न झालेल्या व रोजंदारीवर कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचार्यांना कोंडीत पकडण्यासाठी महामंडळाने ह्या कर्मचार्यांना 24 तासात कामावर रूजू होण्याचे आदेश दिले त्याचप्रमाणे कामावर हजर न झाल्यास सेवामुक्त करण्यात येणार असल्याचे कळविले असल्याने अखेर ह्या रोजंदारी कर्मचार्यांनी कर्तव्यावर हजर होण्यास सशर्त तयारी दर्शविली असुन तसे निवेदन काही कर्मचाऱ्यांनी आगार व्यवस्थापकांना दिल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार ह्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पत्रात आपल्या मागण्या मांडल्या असुन त्या मागण्या पुर्ण होणार असल्यास आपण कर्तव्यावर हजर होण्यास तयार असल्याचे कळविले आहे.