अहमदनगर रुग्णालयात ICU मधील आग प्रकरण, प्रशासनाने डॉ. विशाखा शिंदे यांचा घेतला बळी.

41

अहमदनगर रुग्णालयात ICU मधील आग प्रकरण, प्रशासनाने डॉ. विशाखा शिंदे यांचा घेतला बळी.

अहमदनगर रुग्णालयात ICU मधील आग प्रकरण, प्रशासनाने डॉ. विशाखा शिंदे यांचा घेतला बळी.
अहमदनगर रुग्णालयात ICU मधील आग प्रकरण, प्रशासनाने डॉ. विशाखा शिंदे यांचा घेतला बळी.

✒मिडिया वार्ता न्यूज टिम✒

अहमदनगर:- काही दिवसा आगोदर स्थानिक अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आय.सी.यू च्या कोविड वार्ड मध्ये भीषण अग्नी तांडव हौऊन अनेक कोरोना वायरस बाधित रुग्णांचा आगीत होळपळुन मृत्यु झाला होता. या आगी मुळे संपुर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती. त्यामूळे सरकार कारवाई करत आहे. पण सरकारी कारवाई म्हणजेच चोराला शोडून संन्याशाला फासी अशी दिसून येत आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्या वर दाखल झाला आहे. त्यात एका महिला डॉक्टरवर विशाखा शिंदे
सर्व खापर फोडून सरकार या घटनेवर पडदा टाकत आहे.

कोन आहेत डॉ. विशाखा शिंदे?
डॉ. विशाखा ह्या अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अस्थीरोग (Orthopedics) विभागात पदव्युत्तर पदवीका (Post-graduate diploma) करणाऱ्या शिकाऊ डॉक्टर आहेत. थोडक्यात काय तर त्या अस्थीरोग विभागात शिकणाऱ्या विद्यार्थीनी आहेत.

“त्या” दिवशी नेमके काय झाले?
जिल्हा रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांवर उपचार चालू असणाऱ्या ICU विभागात शार्ट शर्कीतमुळे आग लागली. त्या कारणाचा शोध पोलीस व शासनाच्या इतर यंत्रणा करत आहेत. या आगीत होरपळून काही रुग्णांचा दुर्दैवी अंत झाला. डॉ. विशाखा ह्या त्या दिवशी या विभागात ड्युटी वर होत्या.

मग आता नेमकी अडचण काय?
या प्रकरणी कारवाई म्हणून त्या दिवशी ड्युटी वर असणाऱ्या काही परिचारिका आणि डॉ. विशाखा ह्यांना या प्रकरणी दोषी ठरवले गेले. आरोग्य विभागाने यांना निलंबित केले तर पोलीस विभागाने यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना अटक केली. निलंबित केल्याच्या तिसऱ्या दिवशी आरोग्य विभागाला आपली चूक लक्षात आली. डॉ. विशाखा ह्या शिकाऊ डॉक्टर असल्यामुळे त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली.

परंतु पोलिस विभागाने मात्र त्यांच्या वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आणि डॉ. विशाखा यांच्या अडचणीत वाढ झाली. त्या आजतागायत कोठडी मध्ये आहेत आणि प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत.

आपल्या कडून काय अपेक्षा?
डॉ. विशाखा शिंदे ह्या एक एम.बी.बी.एस डॉक्टर आहेत. त्या एक डॉक्टर आहेत या नात्याने तरी या संघटनांनी त्यांना पाठिंबा देत मदत करायला हवी होती. पण ती मदत होताना दिसत नाही.

डॉ. विशाखा ह्या एका सरकारी रुग्णालयात आपली जबाबदारी बजावत होत्या. त्या तिथे एक शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करत होत्या. रुग्णालय प्रशासन आणि नियोजन यांच्याशी त्यांचा काही एक संबंध नव्हता. त्यामुळे जर काही तांत्रिक कारणांमुळे आग लागली असेल तर डॉ. विशाखा ह्यांना त्या प्रकरणी दोषी ठरवणे सर्वस्वी चुकीचे आहे. रुग्णालयातील आग रोधक यंत्रणा आणि त्याची तपासणी ( fire safety audit) याच्याशी त्यांचा काही एक संबंध नाही. तरीही त्यांना या प्रकरणी गोवण्यात येत आहे. डॉ. विशाखा ह्यांचा बळी देऊन खऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घळण्याची ही खेळी आहे. ड्युटीवर असणारा डॉक्टर रुग्ण तपासणी करेल की वार्ड मधील वायरीग आणि इलेक्ट्रॉनिक वास्तू तपासेल?

पदव्युत्तर शिक्षण घेऊन समाजात नावारुपाला येण्याच्या डॉ. विशाखा ह्यांच्या स्वप्नाला ह्यामुळे सुरुंग लागला आहे. आज डॉ. विशाखा आहेत, उद्या दुसरे कोणी असू शकेल. त्यामुळे ह्या विरोधात बोलले गेलेच पाहिजे. म्हणून डॉ. विशाखा ह्यांना त्यांच्या प्रोफेशन मधील माणसांची गरज आहे. आपल्या वैयक्तिक पातळीवर तसेच आपण ज्या कुठल्या संघटनेत असाल त्या संघटनेच्या पातळीवर डॉ. विशाखा ह्यांना समर्थन आपण कराल आणि एका डॉक्टरच आयुष्य उध्वस्त होण्यापासून त्यांना वाचवाल अशी अपेक्षा समजातून समोर येत आहेत.