माणगांव शहरातून चक्क मोटारसायकल गेली चोरीला..

माणगांव शहरातून चक्क मोटारसायकल गेली चोरीला..

माणगांव शहरातून चक्क मोटारसायकल गेली चोरीला..

✍संतोष मोरे✍
इंदापूर विभाग प्रतिनिधी
📞 7276143020📞

इंदापूर :- माणगांव शहरातून मोटारसायकल चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. या प्रकरणी माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुरेश शंकर बक्कम, वय ५२ वर्ष व्यवसाय शेती, रा. निजामपूर रोड पंकज खामगावकर रूम मध्ये छत्रपती करियर ऍकेडमी चे बाजूला ता. माणगांव. यांची काळ्या रंगाची होंडा मोटारसायकल सीबी शाईन नं. क्र. एम. एच. ०६ बिझेड ४५८९ ही अंदाजे २५०००/रु किंमतीची.
दि.१३ ते १४ रोजी. रात्री १०.०० वा. ते सकाळी. ०५.००वा.चे दरम्यान पंकज खामगावकर यांच्या घराच्या खाली पत्र्याच्या शेड मधून चोरीला गेल्याची तक्रार दि. १५/११/२०२२ रोजी. कॉ.गु.नं. ३३३/२०२२ भा. द. वि.स.३७९ या कलमा प्रमाणे अज्ञात इसमा वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कामी पो.नि. श्री. पाटील, माणगांव पोलीस, दाखल अंमलदार पोना/१६२४ खिरीट, तपास अंमलदार पोसई गायकवाड, माणगांव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here