काळेगाव सज्जाचे तलाठी के.डी. बिराजदार यांची बदली करण्यात यावी -अविनाश गाताडे

50

काळेगाव सज्जाचे तलाठी के.डी. बिराजदार यांची बदली करण्यात यावी-अविनाश गाताडे

केज/प्रतिनिधी: केज तालुक्यातील काळेगाव सज्जाचे तलाठी के.डी.बिराजदार हे शेतकऱ्यांची जाणून-बुजून आडवणुक करून सज्जावर न येणे केज येथील ऑफिसला पण केव्हातरीच येणे व कामाबाबत विचारणा केली तर उडवा उडवीची उत्तरे देत असल्या कारणाने त्यांची इतरत्र बदली करून त्यांच्या जागेवर दुसऱ्या तलाठ्यांची नेमणूक करण्यात यावी अशा मागणीचे लेखी निवेदन काळेगावचे सरपंच अविनाश गाताडे यांनी तहसीलदार केज यांच्याकडे केली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, केज तालुक्यातील काळेगाव सज्जला तलाठी म्हणून के.डी. बिराजदार हे सध्या कार्यरत आहेत. ते तलाठी सज्जावर तर कधी येतच नाहीत. पण केज येथील ऑफिसला शेतकरी गेले तर तेथेही भेटत नाहीत.न जाणून एखाद्या वेळी भेट झाली तर सदरील शेतकऱ्यास उडवा उडवी चे उत्तरे मिळत आहेत. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. याचे कारण काय असावे यासाठी शेतकरी तलाठ्याकडे चक्रा मारत आहेत.

तर तलाठी ऑफिसला नाहीत त्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झालेले आहेत. अनुदानासाठी कोणाला भेटायचे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. व अनुदान कसे मिळेल,त्रुटी काय आहे याची माहिती मिळू शकत नाही.

एखाद्या वेळी तलाठी साहेब न जाणून शेतकऱ्यास भेटले तर ते उडवा उडवीची उत्तरे देऊन परत पाठवतात व शेतकऱ्यांचे कोणतेही काम करण्याचा त्यांचा मानस दिसून येत नाही. त्यामुळे तात्काळ सदरील तलाठी यांची काळेगाव सज्जातून बदली करून दुसऱ्या तलाठ्यांची नियुक्ती करून शेतकऱ्यांची अडकलेली कामे तात्काळ करण्यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात यावी असे लेखी निवेदनात सरपंच अविनाश गाताडे यांनी म्हटले आहे. निवेदनावर सरपंच अविनाश गाताडे यांची स्वाक्षरी आहे. ‌