शितल मोरे मृत्यू प्रकरण – सिविल सर्जनवर गुन्हा दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

57

शितल मोरे मृत्यू प्रकरण – सिविल सर्जनवर गुन्हा दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

नाशिक प्रतिनिधी ज्ञानेश्वर तुपसुंदर
मो. 8668413946

नाशिक | प्रतिनिधी
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराअभावी प्रसूतीनंतर शितल मोरे या युवतीचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक प्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर, विशेषतः सिविल सर्जन व अकार्यक्षम डॉक्टरांवर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करावी, अशी ठाम मागणी वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली.

घटनेत मिळालेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२५ रोजी शितल मोरे यांची प्रसूती नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाली. प्रसूतीनंतर केवळ दुसऱ्या दिवसापासून त्या तीव्र पोटदुखीने विव्हळू लागल्या. नातेवाईकांनी नर्स आणि अधिकाऱ्यांना सतत संपर्क करून परिस्थितीची माहिती देत ऑक्सिजन द्यावा किंवा आयसीयू मध्ये हलवावे, अशी विनंती केली. मात्र ही विनंती गांभीर्याने न घेता तिला अंदाजे चार ते पाच तास विना उपचार बेडवरच पडून ठेवण्यात आले, असा आरोप नातेवाईकांनी केला.

दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकूण 30 अद्ययावत आयसीयू बेड उपलब्ध असतानाही त्या महिलेचा आयसीयू मध्ये समावेश करण्यात आला नाही. डॉक्टरांनी आयसीयू बेड उपलब्ध नसल्याचे कारण देत अतिरिक्त शल्यचिकित्सकाकडूनही दखल घेतली नाही, अशी गंभीर तक्रार करण्यात आली आहे.

तसेच जिल्ह्यात दोन मेडिकल कॉलेज असतानाही शितल मोरे यांना कोणत्याही इतर रुग्णालयात रेफर केले नाही, हा गंभीर निष्काळजीपणा मृत्यूचे थेट कारण असल्याचा आरोप करण्यात आला. परिस्थिती बिकट असताना सिविल सर्जनला नातेवाईकांनी न्याय मागितल्यावर, “उपसंचालकच निर्णय घेतील” व “येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही, धुळे येथे जावे” अशी भूमिका त्यांनी घेतल्याचा आरोप करण्यात आला.

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, मृत्यू झाल्यानंतरही पोस्टमॉर्टम अहवालामध्ये न्याय नाही तसेच घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाल्याची भावना मृत महिलेच्या कुटुंबाने व्यक्त केली.

या संपूर्ण प्रकरणाला अनुसरून “एका मागासवर्गीय महिलेवर अन्याय आणि दुर्लक्ष करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही” असा पवित्रा वंचित बहुजन आघाडीने घेतला.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहून सिविल सर्जनसह जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, निलंबन कारवाई करावी आणि तत्काळ सेवा बंद करावी, अशी मागणी असलेले निवेदन सादर केले.

निवेदन देताना उपस्थित

चेतन गांगुर्डे (जिल्हाध्यक्ष), बाळासाहेब शिंदे (जिल्हा प्रवक्ते), उर्मिला गायकवाड (महिला जिल्हा अध्यक्ष), दामोदर पगारे (युवा जिल्हा अध्यक्ष), रवी अण्णा पगारे, दीपक पगारे (युवा महानगर प्रमुख), युवराज मनेरे (युवा महानगर महासचिव), विकास लाटे, संतोष वाघ (तालुका महासचिव), विकी वाकळे (तालुका अध्यक्ष), नाना तपासे (महानगर उपाध्यक्ष), राहुल नेटवटे (सचिव), समीर गायकवाड, राजू गोतीस, विलास गुंजाळ, बाबा निकम, दीपक नावळे (संघटक), समाधान शिलावट, शब्बीर शेख, माया मोरे, मनोज उबाळे, शाहरुख पठाण (महानगर उपाध्यक्ष), नीतू सोनकांबळे, संपत हिवराळे, संभाजी कारके, मिहिर गजभिये (सम्यक जिल्हाध्यक्ष), विनोद शेलार, अजय केंदळे, सोमा मोहिते, रूपचंद चंद्रमोरे, आदित्य दोंदे, तसेच पीडित पती निलेश मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लवकर कारवाई न झाल्यास आंदोलनाची चेतावणी

राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधितांना पदावरून हटवून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. अन्यथा मोठ्या आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला.