Home latest News हयात प्रमाणपत्र सादर करण्यास 10 दिवसांचा अवधी ; डिसेंबरमध्ये होऊ शकते पेन्शन...
हयात प्रमाणपत्र सादर करण्यास 10 दिवसांचा अवधी ; डिसेंबरमध्ये होऊ शकते पेन्शन बंद
अरुणकुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
मो. क्र. 7715918136
पनवेल : सर्व पेंन्शन धारकांनी पेन्शन मिळणे सुरू ठेवण्यासाठी १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान वार्षिक हयात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकाक आहे. हयात प्रमाणपत्र सादर न केल्यास पुढील महिन्यापासून त्यांची पेन्शन रोखली जाऊ शकते. त्यामुळे पेन्शन धारकांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र ३० नोव्हेंबरपर्यंत देणे बंधनकारक आहे.
⚜️प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत ३० नोव्हेंबर (अंतिम तारीख)
प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत ३० नोव्हेंबर (अंतिम तारीख) निश्चित करण्यात आली आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन डिसेंबरपासून थांबवले आहे. पेन्शन धारकांनी दरवर्षी जाणार नोव्हेंबर महिन्यात नवीन डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र एक वर्षासाठी वैध असते.
⚜️बँकेत जाण्याची गरज नाही
आता पेन्शनधारकांना प्रत्यक्ष बँकेत जाण्याची गरज नाही. केंद्र सरकारच्या अधिकृत ॲपवरून किंवा फेस ॲपद्वारे घरबसल्या डिजिटल प्रमाणपत्र तयार करता येते. मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉपवर इंटरनेट आणि आधार क्रमांक असल्यास ही प्रक्रिया सहज शक्य आहे. तसेच आपल्या परिसरातील ऑनलाईन केंद्रांवर सुद्धा आपण हयात प्रमाणपत्र काढू शकतो.
⚜️ मोबाईल कॅमेऱ्यातून चेहरा स्कॅन करून प्रमाणपत्र
आधार आधारित चेहरा ओळख प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अंगठ्याचा ठसा किंवा बायोमेट्रिक उपकरणाची गरज उरलेली नाही. केवळ मोबाईल कॅमेऱ्यातून चेहरा स्कॅन करून प्रमाणपत्र मिळते.
⚜️सरकारी पेन्शनर्सना बँकेत जावे लागणार
राज्य सरकारच्या पेन्शनधारकांना मात्र प्रत्यक्ष बँकेत किंवा संबंधित कोषागार कार्यालयात जाऊन स्वतःचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. राज्य पातळीवरील डिजिटल प्रणाली अद्याप सर्वत्र कार्यान्वित झालेली नाही. नवीन ॲपमुळे ही प्रक्रिया अतिशय सोपी झाली आहे.