Home latest News मुंबई विभागीय शालेय कराटे स्पर्धेत चॅम्पियन कराटे क्लब म्हसळा च्या विध्यार्थ्यांची चमकदार...
मुंबई विभागीय शालेय कराटे स्पर्धेत चॅम्पियन कराटे क्लब म्हसळा च्या विध्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
चार सुवर्ण, दोन रौप्य, एक कांस्य पदक मिळवुन यश संपादन
म्हसळा: संतोष उध्दरकर.
म्हसळा: दि. १७ व १८ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे झालेल्या मुंबई विभागीय शालेय कराटे स्पर्धेत चॅम्पियन कराटे क्लब म्हसळा येथील मुलांनी चमकदार कामगिरी करत आपल्या गावाचे, क्लास चे तसेच आपल्या शाळेचे नाव मोठे केले असल्याने स्पर्धकांचे सर्व स्तरातुन कौतुक होतांना दिसत आहे.या स्पर्धेत यश संपादन केलेले स्पर्धक विजयी खेळाडू कु.विक्रांत विश्वास खांडेकर सुवर्ण पदक , कु.सोहेल शशिकांत तांबे सुवर्ण पदक, कु.नीरजा अंकित धोत्रे सुवर्ण पदक, कु. निर्मई यतीन करडे सुवर्ण पदक, कु.आर्या योगेश करडे रौप्य पदक, कु. आर्य प्रशांत करडे रौप्य पदक , कु.नीरव गोपीनाथ पवार कांस्य पदक पटकावत आपल्या शाळेचे नाव मोठे केले आहे,तसेच कु.विक्रांत खांडेकर, कु.सोहेल तांबे, कु.नीरजा धोत्रे व कु. निर्मई करडे या सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची निवड दिनांक २१ ते २४ नोव्हेंबर रोजी बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धसाठी निवड करण्यात आली असून.त्या बदल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सर्व विद्यार्थांना सेन्साई अविनाश मोरे व शिहान संतोष मोहिते तसेच अभय कलमकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.