डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तमध्य रेल्वे प्रशासन सज्ज

245

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तमध्य रेल्वे प्रशासन सज्ज

नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर आणि अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे.

त्रिशा राऊत

नागपूर क्राईम रिपोर्टर

मो 9096817953

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर आणि अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे.या गाड्यांना उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ, जळगांव, चाळीसगांवसह नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी या स्थानकांचा थांबा असल्याने प्रवाशांना लाभ होणार आहे.

नागपूर ते मुंबई एकेरी विशेष गाडी क्रमांक ०१२६० चार डिसेंबर रोजी नागपूर येथून १८.१५ वाजता सुटेल. आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२६२ चार डिसेंबर रोजी नागपूर येथून २३.५५ वाजता सुटेल. आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १५.०५ वाजता पोहोचेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२६४ पाच डिसेंबर रोजी नागपूर येथून ०८.०० वाजता सुटेल. आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२६६ पाच डिसेंबर रोजी नागपूर येथून १८.१५ वाजता सुटेल. आणि छत्रपतीशिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२६६ पाच डिसेंबर रोजी नागपूर येथून १८.१५ वाजता सुटेल. आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल.
या गाड्यांना अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगांव, धामणगांव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगांव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर या स्थानकांचा थांबा आहे. या गाड्यांना १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि दोन गार्ड ब्रेक डबे असतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर एकेरी विशेष गाडी क्रमांक ०१२४९ सहा डिसेंबर रोजी मुंबई येथून २०.५० वाजता सुटेल. आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ११.२० वाजता पोहोचेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२५३ सात डिसेंबर रोजी दादर येथून ००.४० वाजता सुटेल. आणि नागपूर येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२५१ सात डिसेंबर रोजी मुंबई येथून १०.३० वाजता सुटेल. आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ००.५५ वाजता पोहोचेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२५५ सात डिसेंबर रोजी मुंबई येथून १२.३५ वाजता सुटेल. आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता पोहोचेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२५७ आठ डिसेंबर रोजी मुंबई येथून ००.२० वाजता सुटेल. आणि नागपूर येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.
या गाड्यांना दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगांव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव, पुलगांव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी हे थांबे आहेत. या गाडीला १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि दोन गार्ड ब्रेक डबे असतील.

अमरावती- मुंबई अनारक्षित विशेष गाडी क्रमांक ०१२१८ पाच डिसेंबर रोजी अमरावती येथून १७.४५ वाजता सुटेल. आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०५.४५ वाजता पोहोचेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२१७ सात डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ००.४० वाजता सुटेल. आणि अमरावती येथे त्याच दिवशी १२.५० वाजता पोहोचेल.
या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे थांबे आहेत. या गाडीला १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि दोन गार्ड ब्रेक डबे असतील.