अँड.रत्नाकर पाटील यांची भाची विशाखा हिचा विवाह संपन्न

102

अँड.रत्नाकर पाटील यांची भाची विशाखा हिचा विवाह संपन्न

अनेक मान्यवरांची विवाह सोहळ्याला उपस्थिती

अलिबाग(विशेष प्रतिनिधी) रायगड जिल्ह्यातील पत्रकार अँड.रत्नाकर पाटील यांची भाची चि.विशाखा हिचा शुभ विवाह चिरंजीव अनिकेत यांच्यासोबत नुकताच संपन्न झाला. यावेळी राजकीय सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अलिबाग तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार अँड. रत्नाकर पाटील यांची भाची व श्री चंद्रकांत ठाकूर यांची कन्या चि.विशाखा हिचा विवाह सोमवार दिनांक १७/११/२०२५ रोजी श्री.नितीन ठाकूर कोपर अलिबाग यांचा सुपुत्र चिरंजीव अनिकेत यांच्या सोबत परहुरपाडा अलिबाग येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.

यावेळी वधूवराला शुभ आशीर्वाद देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मानसीताई दळवी, माजी पंचायत समिती सदस्य सिद्धनाथ पाटील, परहूर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रफुल्ल पाटील, प्रसिद्धसंगीत दिग्दर्शक ,गायक अच्युत ठाकूर यांच्या पत्नी ठाकूर मॅडम, पेढांबे ग्रामपंचायत च्या सरपंच रसिका पाटील, माजी सरपंच रवींद्र पाटील, राष्ट्रीय कब्बडी खेळाडू विजय म्हात्रे, प्रसिद्ध व्यावसायिक व माजी सरपंच अरविंद पाशिलकर, माजी सरपंच प्रज्ञा पाटील,वाघ्रण ग्रामपंचायत चे माजी सरपंच हरीचंद्र पाटील, अखिल भारतीय मानव अधिकार संघटनाचे रायगड जिल्हाप्रमुख कृष्णकांत पाटील, अखिल भारतीय सेना चे रायगड जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे,मुंबई महानगरपालिका माजी नगरसेविका रुपालीताई म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार आविष्कार देसाई,विजय गावंड,आंबा बागायतदार मोहन ठाकूर,ग्रामपंचायत सदस्य परेश गुंजाळ, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे वाय.बी.पाटील,रायगड जिल्हा फोटोग्राफर संघटना उपाध्यक्ष समीर मालोदे , रिलायन्स चेराजेद्र नागावकर,पोलिस अधिकारी दिनेश बिर्जे,नवनाथ पाटील,राजेश म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे,रीना महेश पाटील,माध्यमिक विद्या मंदिर फोफेरी हायस्कूल चे १९८९ बॅच चे सर्व मित्र परिवार,निवेदक संतोष वाघमारे, RCF कर्मचारी वर्ग याच्या सह सामाजिक,राजकीय,व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.