टाकळी (निधा) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना मंदिराचे भूमिपूजन

56

टाकळी (निधा) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना मंदिराचे भूमिपूजन

आ.डॉ. आंबटकर यांच्या विशेष निधीतून होणार 10 लक्ष रुपयाचे बांधकाम

डॉ.पर्बत यांच्या पाठपुराव्याला यश


प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

हिंगणघाट :-18 डिसेंबर टाकळी (निधा) येथे हिंगणघाट पं.स.सदस्य डॉ.विजय पर्बत यांच्या विशेष प्रयत्नातुन विधान परिषद आमदार डॉ.रामदास आंबटकर यांनी 10 लक्ष रूपये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना समाज मंदिराचे बांधकामासाठी मंजूर केले असून आमदार आंबटकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आले, गेल्या अनेक दिवसापासून टाकळी येथे राष्ट्रसंतांचे प्रार्थना मंदिर व्हावे ही गुरुदेव सेवा मंडळाची मागणी पं.स.सदस्य डॉ. पर्बत यांचे कड़े होती, त्यामुळे पर्बत यांनी विशेष लक्ष देवून आमदार आम्बटकर यांचे कड़े सतत पाठपुरावा केल्याने 10 लक्ष रुपयांचे प्रार्थना मंदिर मंजूर करण्यात आले असून आ.डॉ.आंबटकर यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी वर्धा जिल्हा परिषदेचे माजी सभापती वसंतराव आंबटकर ,जी. प.सदस्य ज्योत्स्ना सरोदे,हिंगणघाट पं.स.सभापती शारदा आंबटकर पं.स.सदस्य व भोजाजी महाराज संस्थान चे अध्यक्ष डॉ विजय पर्बत भाजपा चे तालुका सरचिटणीस तुषार आंबटकर, राजू किटकुले बंडुजी शंभरकर ,विनोद जौंजाळ रत्नाकरराव लोंढे ,माधव माहुरे,हेमंत जौंजाळ भास्कर राऊत सरपंच आशीष राऊत यांची उपस्थिती होती.