शेतकरी विरोधी कायद्याच्या आंदोलनात भूमिपुत्र संघर्षवाहिनीचा सहभाग.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

वर्धा दिनांक १८ डिसेंबर:- वर्धा जिल्हा शेतकरी-कामगार आंदोलन समन्वय समिति द्वारा आयोजित बजाज चौक वर्धा येथे शेतकरी-कामगार विरोधी कायदे तात्काळ रद्द करा या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. याप्रसंगी भूमिपुत्र संघर्षवाहिनी चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अभिजीत पाटिल फाळके प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी शेतकरी विरोधी कायदे कसे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही याचे विस्तृत विश्लेषण करुण मार्गदर्शन केले. सरकारने केलेले हे कायदे याचे दुष्परिणाम हे सर्वसामान्य जनतेवर पडणार असून या कायद्यामुळे शेतकरी-कामगार हा देशोधड़ीला लागणार आहे. म्हणून या कायद्याला विरोध करीत वर्धा जिल्हा शेतकरी-कामगार आंदोलन समन्वय समितिला भूमिपुत्र संघर्षवाहिनी चा भक्कम पाठिंबा असून हे आंदोलन अधिक प्रभावशाली करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले. वेळ पडल्यास जिल्ह्यातील सर्व संघटनांना विश्वासात घेवून दिल्लीला जावून सुद्धा आंदोलन करू असा इशारा अभिजीत पाटील फाळके यांनी दिला. या प्रसंगी भूमिपुत्र संघर्षवाहिनी चे राज्य संयोजक रितेश घोगरे, जिल्हाध्यक्ष योगेश घोगरे, प्रा. प्रवीण काटकर, डॉ. कपिल मून, प्रवीण पेठे, प्रवीण उगेमुगे, किशोर मुटे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले तसेच किसान अधिकार अभियान चे जिल्हा अध्यक्ष अविनाश काकडे यांनी सुद्धा विचार व्यक्त करुण केंद्र सरकारच्या कायद्याचा विरोध करीत आंदोलन अधिक बळकट करण्याचा इशारा दिला. या आन्दोलनाला अधिक प्रभावशाली आणि यशस्वी करण्यासाठी भूमिपुत्र संघर्षवाहिनीचे समीर राऊत, पंकज इंगोले, स्वप्निल किटे, सचिन गौळकार, शशिकांत वीरखडे, शुभंम उगेमुगे, कपिल देशमुख, चंद्रशेखर जगताप, प्रवीण ठाकरे, नीलेश भोयर, नंदू होनाडे, दिपक शेळके, चंद्रपाल भगत, रूपेश शेळके, मनीष देशमुख, विवेक लोहकरे, स्वप्नील देशमुख, नितिन वानखेडे, संदीप भांडवलकर, पराग खंगार, अस्लम पठान, योजनाताई ढोक, प्रतिभाताई ठाकुर, रोहिणी बाबर, ममता बालपांडे, रीमा चौधरी, तेजस्विनी देशमुख, सविता नरांजे, नीलिमा जांभूळकर प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here