कल्याण भाजप महिला अध्यक्षाने महिलांना लावला कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी ताब्यात.

रेखा जाधव यांनी काही महिलांना 18 महिन्यात पैसे दामदुप्पट करून देण्याचे आश्वासन दिले होते. एक कोटी 70 लाख रुपये घेतले गेले

कल्याण:- भाजपच्या कल्याणमधील महिला अध्यक्ष रेखा जाधव यांना पोलिसांनी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. रेखा जाधव यांच्यासह चार जणांवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणच्या गौरीपाडा परिसरात राहणाऱ्या चंद्रप्रभा ढगले या महिलेच्या तक्रारीवरुन कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी कल्याणमध्ये राहणारा श्रीकांत राव,संदीप सानप, रेखा जाधव आणि सुनिल आव्हाढ या चौघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांवर आरोप आहे की, त्यांनी संगनमत करुन काही महिलांकडून एक कोटी 70 लाख रुपये घेतले. 18 महिन्यात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून हे पैसे घेतले गेले. कोणाला कडून २० लाख, ३० लाख रुपये असे करुन एक कोटी 70 लाख रुपये घेतले गेले आहेत. या चौघां विरोधात काही महिन्यापासून तक्रार देण्यात आली होती. मात्र पोलिस तपास करीत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकाल लवांडे यांचा पुढाकाराने अखेर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विकास लवांडे यांचे म्हणणे आहे की, पाच वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबीत होते. हे प्रकरण माझाकडे आले. गृहमंत्र्याकडे या प्रकरणी पाठपुरावा केल्यावर गृहमंत्र्यांच्या आदेशापश्चात हा गुन्हा दाखल झाला आहे. गोरगरीबां महिलांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. पोलिस योग्य रितीने तपास करीत असा विश्वास आहे. ज्यांची कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी पुढे यावे. भारतीय जनता पार्टीने लूट करणारे कार्यकर्ते समाजात फेरले असतील तर ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.

श्रीकांत राव यांनी पैसे दुप्पट करण्याच्या आमिष दाखवून पैसे घेतले. जेव्हा कधी महिला पैसे मागाचे. पोलिस ठाण्यात जाण्याचे धमकी द्यायचे रेखा जाधव त्यांची समजूत काढून त्यांना थांबवायची. ही मोडस ऑपरेंडी असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here