बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलाखाली चार चाकी वाहन कोसळून भीषण अपघात एकाचा मृत्यू ,दोन गंभीर जखमी

57

बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलाखाली चार चाकी वाहन कोसळून भीषण अपघात
एकाचा मृत्यू ,दोन गंभीर जखमी

बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलाखाली चार चाकी वाहन कोसळून भीषण अपघात एकाचा मृत्यू ,दोन गंभीर जखमी
बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलाखाली चार चाकी वाहन कोसळून भीषण अपघात
एकाचा मृत्यू ,दोन गंभीर जखमी

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

विसापूर : दारूच्या नशेत बेधुंद युवकाचे चारचाकी भरधाव धावणाऱ्या वाहनांवरून नियंत्रण सुटल्याने बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलाखाली वाहन कोसळून भीषण अपघात झाला. त्यामध्ये चार युवका पैकी एक युवक जागेवरच ठार झाला तर दोघे गंभीर जखमी व एक जखमी आहे.
चार युवक एका खाजगी कामानिमित्त चंद्रपूर वरून काम आटपून सायंकाळी ४-३० वा दरम्यान मदिरा प्राशन करून बल्लारपूर कडे येत असताना भरधाव धावणाऱ्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलावरून चार चाकी वाहन ( एम एच ३४ बी आर ०१४१) खाली कोसळले त्यामध्ये अभिषेक गुप्ता (२२) रा. गोरक्षण वार्ड बल्लारपूर हा जागेवरच ठार झाला तर रोहित सुभाष तोगरवार(२१) व मोहन सल्लारेडी (२१) रा.बालाजी वार्ड बल्लारपूर, हे गंभीर जखमी झालेत व भुवन गजभिये (२१) रा.राजुरा हा जखमी झाला. वाहन खाली कोसळल्यावर एका युवकाच्या हातात दारूच्या बाटल्या दिसल्या असे प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली यावरून ते अत्यंत बेधुंद अवस्थेत वाहन चालवत होते असे दिसून येते. चंद्रपुर सिटी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घटना स्थळी पोहोचले व जखमींना तात्काळ चंद्रपूर सामान्य रुग्णालयात हलवले वृत्त हाती येईपर्यंत दोघांची प्रकृती गंभीर असून एका युवकाला किरकोळ जखमी असल्याने सुट्टी देण्यात आली.अशी माहिती मिळाली