नैसर्गिक पर्यटन स्थळांची स्वच्छता व पावित्र्य जपा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे पर्यटकांना आवाहन चौसाळा टेकडी येथे श्रमदानातून केली स्वच्छता दर आठवड्यात नैसर्गिक पर्यटनस्थळी स्वच्छता मोहीम राबविणार
नैसर्गिक पर्यटन स्थळांची स्वच्छता व पावित्र्य जपा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे पर्यटकांना आवाहन चौसाळा टेकडी येथे श्रमदानातून केली स्वच्छता दर आठवड्यात नैसर्गिक पर्यटनस्थळी स्वच्छता मोहीम राबविणार

नैसर्गिक पर्यटन स्थळांची स्वच्छता व पावित्र्य जपा

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे पर्यटकांना आवाहन

चौसाळा टेकडी येथे श्रमदानातून केली स्वच्छता
दर आठवड्यात नैसर्गिक पर्यटनस्थळी स्वच्छता मोहीम राबविणार

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016

यवतमाळ : – जिल्ह्यातील नैसर्गिक पर्यटन स्थळे तसेच तीर्थस्थळावर स्वच्छता राखून या ठिकाणाचे पावित्र्य जपण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिकांना केले आहे.

यवतमाळ येथून पाच-सहा किलोमीटर अंतरावरील चौसाळा टेकडी या नैसर्गिक पर्यटन स्थळावर आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वाखाली श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता अभियानात उपवनसंरक्षक सतिश वाबळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार व-हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे, वनाधिकारी अनंत डिकोडे, सावित्रीबाई फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. धरणे, श्री. राठोड व विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी चौसाळा टेकडीवरील गवत, प्लास्टिक, दारूच्या बाटल्या यासारखा कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली.
यापुढे दर आठवड्यात नैसर्गिक पर्यटन स्थळावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here