कळमेश्वर अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध येरला येथील महिला आक्रमक

*अवैध दारू विक्री त्यांच्या घरावर छापा
* दारू विक्रेत्यांच्या गाड्यांना सुद्धा लावली महिलांनी आग


युवराज मेश्राम प्रतीनिधी

कळमेश्वर:- पोलीस स्टेशन हद्दीमधील येरला गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आरोपींकडून अवैध दारू विक्री चा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याकारणाने महिलांनी एकत्रित येऊन या अवैध दारू विक्रीला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने रोज रात्री ला गावामध्ये दारू विक्रेत्यांच्या घराजवळ बसून दारू विक्रीस मज्जाव केला महिलांनी याबाबतची माहिती पोलीस स्टेशन कळमेश्वर आणि ग्रामपंचायतला देऊन अवैध दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली त्याच दरम्यान आरोपींकडून स्थानीय तरुणांना मारहाण केल्याने महिलांनी आक्रमक भूमिका घेत अवैध दारू विक्री त्यांच्या घरावर छापा मार कारवाई केली या कारवाईमध्ये दारू विक्रेत्यांच्या घरातून दारु आणि इतर साहित्य जप्त केले याच दरम्यान काही महिलांनी आक्रमक होऊन अवैध दारू विक्रेत्यांच्या पाच ते सहा दुचाकी पेटवून दिल्या दरम्यान महिला आक्रमक होत असल्याचे बघून अवैध दारू विक्रेत्यांनी गावातून पळ काढला दुपारी बारा वाजता दरम्यान सकाळी पासूनच महिलांनी एकत्र येऊन कळमेश्वर नागपूर रोडवर चक्काजाम आंदोलन केले आंदोलनाची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले याच दरम्यान आमदार समीर मेघे यांनी महिलांना मार्गदर्शन करीत अवैध दारू विक्रेत्यांवर विरुद्ध कारवाई केली जाईल असे आश्वासन देऊन ग्रामपंचायती जवळील हनुमान मंदिराच्या मैदानात ग्रामपंचायतच्या वतीने विशेष ग्रामसभा घेण्यात आली या विशेष ग्रामसभेमध्ये गावांमध्ये कोणीही अवैधरित्या दारू विकणार नाही अवैद्य धंद्यांना पाठबळ देणार नाही अशा बाबतचा ठराव करण्यात आला आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये करण्यात आली ग्रामसभेला विशेष उपस्थिती म्हणून आमदार समीर मेघे, सरपंच मायाताई ठाकरे उपसरपंच प्रमोद गमे यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानीय नागरिकांची उपस्थिती आमदार समीर मेघे दारू विक्रेत्यांनी विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल या आश्वासनानंतर महिलांनी आपले आंदोलन थांबवले.

बिट जमादाराचे या अवैध धंदे वर वरदहस्त होते या अवैध धंदे ची माहिती काही महीलेनी याला दिली होती परंतु हा उलट अवैध धंदेवाल्याना समर्थ करत असे. यांच्या आशीर्वादाने येथे अवैध धंदे चालू असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. उलट हाच नागरिकाशी अरेरावी पण बोलत असे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here