कळमेश्वर अवैध दारु विक्रेत्यांकडून स्थानीय तरुणांना मारहाण.

*येरला येथील महिलांचा दारू विक्रेत्यांच्या घरावर धावा
*आमदार समीर मेघे यांची घटनास्थळावर भेट
*कळमेश्वर पोलिसात तक्रार
*एकूण आठ आरोपींसह अन्य चार विरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल

युवराज मेश्राम

कळमेश्वर:- पोलीस स्टेशन हद्दीमधील येरला गावांमध्ये अवैध दारू विक्रेत्यांची दहशत वाढली असून याच दहशतीतून स्थानीय तरुणांना या दारु विक्रेत्यांकडून लाठी काठीने मारहाण करण्यात आल्याची घटना दिनांक 17 जानेवारी रोजी नऊ वाजता दरम्यान येरला खडगाव रस्त्यावर असलेल्या सच्चो सतराम आश्रमाच्या गेट जवळ घडली यावेळी दारू विक्रेत्यांकडून तरुणांवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला. सुदैवाने स्थानीय तरुणांनी या हल्ल्यातून आपला जीव वाचवला मात्र या हल्ल्यात ते गंभीर रित्या जखमी झाले.

प्राप्त माहितीनुसार अर्जदार अखिल रामभाऊ बदकी वय 23 वर्ष राहणार फेटरी व्यवसायाने गाडी चालक म्हणून काम करत असून दिनांक 17 जानेवारी रोजी रात्री सव्वा आठ वाजताच्या दरम्यान येरला येथील संजू बोंडे याचे चहाची टपरी वर चहा पिणे करिता उभा असताना चहा टपरी चे शेजारी असणारे पंचर चे दुकानदार राजेश तांगले यांनी माहिती दिली की फिर्यादीचा मित्र सचिन सूर्यभान वाढी राहणार येरला यास बोरगाव फाट्यावरील सवेरा झुणका भाकर केंद्र येथे आरोपी गोलू वर्मा ,आनंद वर्मा, अमिनेश वर्मा, आणि त्यांच्यासोबत असलेले तीन चार मित्र मारहाण करीत असल्याचे सांगितले यावेळी राजेश तांगले यांच्यासोबत सवेरा झुणका भाकर केंद्र बोरगाव फाटा येथे गेलो असता मित्र सचिन वाडी न भेटल्याने परत सवेरा झुणका-भाकर केंद्र येथून परत येऊन अर्जदार आणि त्याचा भाऊ तेजू बोडे याचे सह रात्री नऊ वाजताच्या सुमारास दोन-तीन लोकांसह येरला खडगाव रस्त्यावरील सच्चो सतराम आश्रम गेट जवळ गेले असता त्या ठिकाणी आनंद वर्मा, गोलू वर्मा, अमिनेश वर्मा, मनीष वर्मा, लाला यादव, साहिल ढोणे, हेमंत मोंढे, अमन शेवाळे त्याच्यासोबत तीनचार मित्र भेटले त्यापैकी आनंद व गोलू वर्मा यांच्या हातात तलवारी होत्या व मनीष याचे हातात काठी होती वरील सर्व लोक रस्त्यावर तमाशे घालत असताना फिर्यादी अखील याने आरोपी आनंद वर्मा यास त्याचा मित्र सचिन यास का मारले असे विचारले असता आनंद वर्मा याने शिवीगाळ करून हातात लाठ्याकाठ्या तलवारी घेऊन माझे मागे धावून फिर्यादीला मारहाण केली यातील आरोपी मनीष वर्मा याणे डोक्यावर काठीने मारहाण करून दुखापत केली याच वेळी फिर्यदीचा मित्र सचिन यांने भेटून सांगितले की त्याला सुद्धा सवेरा झुणका भाकर केंद्राच्या ठिकाणी वरील आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली वरील सर्व आरोपींनी एकत्र येऊन मारहाण केल्याने फिर्यादी आखिल आणि त्याचा मित्र सचिन या दोघांनी कळमेश्वर पोलीस स्टेशन मध्ये येऊन वरील आरोपींविरूद्ध तक्रार दिली कळमेश्वर पोलिसांनी आरोपींविरुद् गुन्हे दाखल केले असून पुढील तपास ठाणेदार आसिफ रजा शेख यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here